इतर

रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे शैक्षणिक साहित्यांचे वाटप*

 

नाशिक : नाशिक रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या सौजन्याने व अक्रोन प्लास्ट प्रा. लि., एमआयडीसी अंबड यांच्या सीएसआर निधीतून  कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय, वडाळागाव नाशिक येथे विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यात शाळेला २ संगणक संच (डिस्प्ले स्क्रीनसह), १ वॉटर फिल्टर, ३ ऑफिस खुर्च्या, ५ सीलिंग फॅन्स तसेच ३ ग्रीन बोर्ड प्रदान करण्यात आले. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अधिक सक्षम आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल रोटे. ज्ञानेश्वर शेवाळे उपस्थित होते. तसेच अॅक्रॉन प्लास्ट प्रा. लि.चे संचालक श्री. विनोद चोप्रा यांची विशेष उपस्थिती लाभली.

या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष रोटे. डॉ. गौरव सामनेरकर, मानद सचिव रोटे. सीए रेखा पाठवर्धन आणि प्रकल्प सचिव रोटे. आर्क. मकरंद चिंधडे  उपस्थित होते.

समाजातील शैक्षणिक क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक सातत्याने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवित असून, भविष्यातही अशाच समाजोपयोगी प्रकल्पांद्वारे सेवा कार्य सुरू राहणार असल्याचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर यांनी याप्रसंगी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button