इतर

श्रीनगर येथील होणाऱ्या आगामी. कार्यक्रमाच्या पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

महादर्पण प्रतिनिधी / श्री एस. के. जाधव


श्रीनगर: १२ स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शांतता,अध्यात्मिक व सांस्कृतिक केंद्र, भारत यांच्या वतीने श्रीनगर येथील SKICC (Sher-i-Kashmir International Convention Centre) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शांतता, अध्यात्मिक व सांस्कृतिक केंद्र, भारताचे संस्थापक व संचालक डॉ. राजीब पाल, तसेच इंडियन नेपाळ मैत्री फोरम ग्लोब कौन्सिल, नवी दिल्लीचे भारताचे (उपाध्यक्ष )डॉ. व्ही. व्ही.पोपेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अनंतनाग जिल्ह्यातील NLP व BJP जिल्हाध्यक्ष कावसर जान, महिला मोर्चाच्या जिल्हा सचिव, तसेच ॲड. इंदरजीत शर्मा, सेवानिवृत्त संचालक महासंचालक अभियोजन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. PRO डॉ.दरख्शान अंद्राबी यांच्यासह श्री. शर्मा यांनीही बैठकीत सहभागी होऊन आगामी कार्यक्रमाच्या नियोजनाची व व्यवस्थेची पाहणी केली.
बैठकीमध्ये कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक व्यवस्था, नियोजन, समन्वय आणि तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शांतता, अध्यात्म, संस्कृती, राष्ट्रीय एकात्मता आणि स्वामी विवेकानंदांचे मानवतेला प्रेरणा देणारे विचार जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या बैठकीत सर्व मान्यवरांमध्ये सकारात्मक व फलदायी चर्चा झाली. आगामी कार्यक्रम भव्य आणि यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
गुलजार अहमद सोफी प्रभारी, जम्मू-काश्मीर स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शांतता, अध्यात्मिक व सांस्कृतिक केंद्र, भारत.
यावेळी कावसर जान, डॉ. सय्यद दरख्शान अंद्राबी,(काश्मीर) डॉ.राजीब पाल,(मध्य प्रदेश) डॉ.व्ही व्ही पोपेरे (महाराष्ट्र राज्य) ॲड. इंदरजीत शर्मा, (जम्मू )पुष्पेंद्र सिंह लोढी, (श्रीनगर )आदित्य झा, अनिल एल. चौहान, (दिल्ली) नाझीर गिलकर, अन्सार (श्रीनगर )पल्हालन हे मान्यवर उपस्थित होते.तसेच Times of Kashmir Valley याबाबतीत महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण बैठक पार पडली. व उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button