इतर

रोटरी क्लब चा श्रमप्रतिष्ठा सन्मान सोहळा प्रेरणादायी उपक्रम  –  बाळासाहेब थोरात  

           

संगमनेर/प्रतिनिधी
 “रोटरी क्लबने आयोजित केलेला हा प्रेरणादायी उपक्रम समाजासाठी निश्चितच आदर्शवत आहे. अशा सोहळ्यांमधून कष्ट, त्याग, संस्कार आणि पालकांविषयीचा आदर या मूल्यांना बळ मिळते तसेच नव्या पिढीला मेहनत, जिद्द आणि कृतज्ञतेची प्रेरणा मिळते.असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
           स्व. के. बी. दादा सभागृह, एस. एम. बी.एस.टी. महाविद्यालय, संगमनेर येथे रोटरी क्लब ऑफ संगमनेरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या “श्रमप्रतिष्ठा सन्मान सोहळा – २०२६” या कार्यक्रमात कष्टकरी पालकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते.अध्यक्षस्थानी रोटरी क्लब संगमनेरचे अध्यक्ष विश्वनाथ मालानी हे होते तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री संगमनेर भूषण रघुवीर खेडकर रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे असिस्टंट गव्हर्नर अमोल वैद्य हे व्यासपीठावर उपस्थित होते.
           यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कि, यशस्वी व्यक्तींचा गौरव समाजात अनेक ठिकाणी होत असतो; मात्र त्या यशामागे आयुष्यभर कष्ट, त्याग, संघर्ष आणि संस्कारांची भक्कम पायाभरणी करणाऱ्या पालकांचा सन्मान क्वचितच होताना दिसतो. अशाच यशामागील खऱ्या शिल्पकारांचा गौरव  रोटरी क्लब, संगमनेरच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केला असून हा प्रेरणादायी व प्रशासकीय उपक्रम असल्याचे माजी मंत्री थोरात यांनी म्हंटले.पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी आपल्या मनोगतातून पालकांच्या कष्टांचे मोल अधोरेखित करताना सांगितले की, “कोणत्याही यशस्वी व्यक्तीमागे त्यागी आई-वडिलांचे कष्ट आणि संस्कार उभे असतात. आज सन्मानित होत असलेले हे पालक खऱ्या अर्थाने समाजाचे आदर्श आहेत.”


      रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे सहाय्यक प्रांतपाल रो. अमोल वैद्य यांनी रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्या सामाजिक व विधायक उपक्रमांचा आढावा घेत आगामी उपक्रमांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.यावर्षी सौ.इंदुमती व .मारुती मुरलीधर फटांगरे (पोखरी बाळेश्वर), सौ. योगिता व श्री.आदित्य दीपक घाटगे (संगमनेर), सौ. संगीता व अशोक लक्ष्मण गायकवाड (नान्नज दुमाला), सौ. सरूबाई व  रायभान किसन अनर्थे (चिंचपूर) आणि सौ. शुभांगी व श्री.संजय रावसाहेब दिघे (जोर्वे) या पालकांचा “श्रमप्रतिष्ठा सन्मान पुरस्कार २०२६” देऊन गौरव करण्यात आला.या पालकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिवस-रात्र परिश्रम करत आपल्या पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या या पालकांच्या त्यागाचे स्मरण होताच सभागृहातील वातावरण अनेकदा भावुक झाले.
        यावेळी पुरस्कारार्थी पालकांच्या यशस्वी पाल्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. श्री संदीप फटांगरे (MD, Ponite India Ltd, Japan), कु यशस्विनी घाटगे, कु ऋतुजा गायकवाड (IAS), सौ वृंदा अनर्थे आणि श्री धनंजय दिघे (IPS) यांनी आपल्या यशस्वी प्रवासातील संघर्षमय दिवस, पालकांनी घेतलेले कष्ट, केलेले त्याग आणि दिलेले संस्कार यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. त्यांच्या मनोगतांनी उपस्थितांच्या डोळ्यांत अनेकदा अश्रू तरळले. यावेळी त्यांनी रोटरी क्लब ऑफ संगमनेरने या अनोख्या उपक्रमाद्वारे पालकांचा सन्मान केल्याबद्दल  आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. विश्वनाथ मालाणी यांनी केले. सूत्रसंचालन रो. भारतभूषण नावंदर आणि रो. समीर शहा यांनी केले, तर सचिव रो. सौरभ म्हाळस यांनी उपस्थितांचे आभार मानले.
       यावेळी माजी प्राचार्य टी एन कानवडे, प्रा. चं. का. देशमुख, ब्रम्हदेव वालझाडे, रोटरी क्लब ऑफ संगमनेर च्या फर्स्ट लेडी सौ. मेघना विश्वनाथ मालाणी आदी मान्यवर, पुरस्कार्थी यांचे  कुटुंबिय,नातेवाईक,मित्रपरिवार, रोटरी क्लबचे सदस्य ही यावेळी उपस्थित होते.
      या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख म्हणून रो. सुनील घुले सर, रो. डॉ. किशोर पोखरकर यांचेसह रो. आनंद हासे, रो. राजेंद्र खोसे, रो. विकास लावरे, रो. हर्षल भागवत, रो. अजित काकडे, रो. दीपक मणियार, रो. दिलीप मालपाणी, रो. महेश वाकचौरे, रो. संदेश चोपडे, रो. अमित पवार यांच्यासह सर्व रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button