इंदोरी गाव चे माजी सरपंच किसनराव देशमुख यांचे निधन

इंदोरी प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील इंदोरी गावचे माजी सरपंच किसनराव नागुजी देशमुख यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले मृत्यूसमयी वय 92 वर्ष होते.
किसनराव देशमुख यांनी गावच्या सरपंच पदासह दूध संस्थेचे चेअरमन पद ही भूषवले होते. ते बस्तीराम सारडा यांच्या उंट बिडी उद्योग समूहाचे मॅनेजर होते. त्यांनी इंदोरी येथील सती तारामतीमातेचे मंदिर उभारणी केली आहे.
त्यांचे पश्चात पत्नी, मुले अगस्ती विद्यालयाचे निवृत्त शिक्षक शांताराम देशमुख , इंदोरीचे माजी उपसरपंच सुभाष देशमुख, माजी प्राचार्य रमेश देशमुख तर नातू जलसंपदा अभियंता अक्षय देशमुख, सचिन कृषी सेवा केंद्राचे संचालक सचिन देशमुख, इंजि. आकाश देशमुख हे आहेत.
इंदुरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
========



