सामाजिक

नाशिक भूषण पुरस्काराने पियूष सोमाणी तर रोटरी भूषण पुरस्काराने डॉ.राजेंद्र नेहेते, विलास शिरोरे यांचा सन्मान

नाशिक प्रतिनिधी

: रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे  औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पियुष सोमाणी यांना नाशिक भूषण तर  सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. राजेंद्र नेहेते आणि सुप्रसिद्ध व्यावसायिक विलास शिरोरे यांना रोटरी भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला़. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ख्यातनाम आयटी तज्ञ तथा लेखक डॉ. उदय निरगुडकर हे होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर होते. हा कार्यक्रम गुरुदक्षिणा सभागृहात संपन्न झाला़.

      कार्यक्रमाच्या प्रारंभी हरी कुलकर्णी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. गौरव सामनेरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नाशिक भूषण डॉ. राजेंद्र नेहेते आणि विलास शिरोरे यांचा परिचय मकरंद चिंधडे आणि मंगेश अपशंकर यांनी करून दिला. नाशिक भूषण पियुष सोमानी यांचा परिचय रोटरीच्या जनसंपर्क संचालिका ॲड. विद्युल्लता  तातेड यांनी  तर  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. उदय निरगुडकर यांचा परिचय डॉ. श्रिया कुलकर्णी यांनी करून दिला. ॲड. मनीष चिंधडे  यांनी मानपत्रांचे वाचन केले.

     रोटरी भूषण डॉ. राजेंद्र नेहेते आणि विलास शिरोरे यांनी रोटरी क्लब ऑफ नाशिक सामाजिक बांधिलकीतून करीत असलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. नाशिक भूषण पुरस्काराने सन्मानित पियुष  सोमाणी यांनी आपल्या मनोगतात रोटरी  क्लब ऑफ नाशिक करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. हा सन्मान माझा एकट्याचा नसून सर्व नाशिककरांचा आहे. या नाशिकने, येथील जनतेने मला घडविलेले आहे, असे भावपूर्ण उद्गार काढून रोटरीच्या कार्याला त्यांनी सदिच्छा दिल्या.

     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. उदय निरगुडकर यांनी आयटी क्षेत्रातील स्थित्यंतराचा आढावा घेऊन आगामी काळात त्याचे असलेले महत्त्व अधोरेखित केले.

आज ज्यांना नाशिक भूषण आणि रोटरी भूषण पुरस्कार मिळाला त्यांनी हे शहर घडवलेय. नाशिक भूषण पुरस्कारासाठी यापुढे महिलांनाही स्थान मिळावे. डॉक्टरांनी रुग्णांना जन्माचा हक्क दिला. समाजासमोर एक डॉक्टर बनण्यासाठी काय करावं लागतं हे समाजाला समजू द्यायला हवं. 

भारताच्या विकासासाठी उद्योजकता महत्त्वाची. इंटरनेट हा २१ शतकाचा महासागर. आयटी हा भारताचा भविष्यकाळ. संपूर्ण जग आज म्हातारे झालेय. आज गाव तिथे उद्योजकतेला महत्त्व आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पूजा एरंडोले यांनी स्वागत गीत म्हटले. सेक्रेटरी सीए रेखा पटवर्धन यांनी आभार मानले.

     कार्यक्रमाला सर्वश्री दिलीप बेनिवाल, शिल्पा पारख, दमयंती बरडिया, अनिल सुकेनकर, ॲड. कांतिलाल तातेड , सुहास कुलकर्णी, रोहित देशपांडे, ऋषिकेश सम्मनवार, डॉ. संतोष साबळे, जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button