इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२१/०७/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: आषाढ ३० शके १९४८
दिनांक :- २१/०७/२०२६,
वार :- भौमवासरे(मंगळवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०५,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०७:०७,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- अष्टमी समाप्ति २९:१७,
नक्षत्र :- चित्रा समाप्ति २०:४९,
योग :- सिद्ध समाप्ति १८:२५,
करण :- विष्टि समाप्ति १६:३६,
चंद्र राशि :- कन्या,(०७:५५नं. तुला),
रविराशि – नक्षत्र :- कर्क – पुष्य,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०५नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:५१ ते ०५:२९ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५८ ते १२:३६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:३६ ते ०२:१३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:५१ ते ०५:२९ पर्यंत,

❀ दिन विशेष:
दुर्गाष्टमी, भद्रा १६:३६ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ ३० शके १९४८
दिनांक = २१/०७/२०२६
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
मानसिक ताण जाणवेल. अति विचार करू नका. आवडते पदार्थ चाखाल. स्वत:ला नियमांमध्ये बांधून घेऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंदित राहील.

वृषभ
गैरसमजाला मनात थारा देऊ नका. खाण्या पिण्यावर ताबा ठेवा. महत्त्वाच्या निर्णयाचा पुनर्विचार करा. कागदपत्रांची योग्य रीतीने छाननी करा. मित्रांशी मतभेदाची शक्यता.

मिथुन
मन:शांती मिळवण्याचा प्रयत्न कराल. कामे ठरवल्याप्रमाणे पार पडतील. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. आपले मत उत्तम प्रकारे मांडावे. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल.

कर्क
मुलांविषयी चिंता वाटू शकते. कामात स्त्रियांचा हातभार लागू शकतो. नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा.

सिंह
कौटुंबिक शांतता जपावी. घरगुती खर्चाचा जमाखर्च तपासा. तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. दांपत्य जीवन सुखकारक राहील. झोपेची तक्रार जाणवेल.

कन्या
महत्त्वाची कामे आधी मार्गी लावावीत. टीका सहन करावी लागू शकते. मतभेदापासून चार पाऊले दूर रहा. वरिष्ठांची भेट घेता येईल. बोलण्यावर व रागावर नियंत्रण ठेवा.

तूळ
भावनिक अस्थिरता जाणवेल. आर्थिक व्यवहारात स्वच्छपणा ठेवावा. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल.

वृश्चिक
भूतकाळातील गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. कर्जाची प्रकरणे त्रासदायक ठरू शकतील. मुलांचे विचार स्व‍च्छंदी वाटतील. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदाराचे विचार जाणून घ्याल.

धनू
नवीन कामाबद्दल सजग रहा. मानसिक चिंता सतावेल. क्षुल्लक गोष्टींची फार काळजी करू नका. चर्चेतून मार्ग काढावा. दुचाकी वाहन सावधपणे चालवावे.

मकर
शांततेचा मार्ग स्वीकारावा. जुन्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नये. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. प्रेमप्रकरणात सावधानतेने पावले उचलावीत. बाह्य गोष्टींची माहिती करून घ्यावी.

कुंभ
भडक प्रतिक्रिया देणे टाळावे. विनाकारण चिंता करत बसू नका. स्वभावातील विनम्रता कायम ठेवा. अनाठायी खर्च वाढवू नका. शिस्तीचा फार बडगा करू नका.

मीन
चांगल्या संधीच्या शोधत रहा. सकारात्मक उर्जेने कामे कराल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. क्षुल्लक गोष्टींवर राग राग करू नका.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button