सामाजिक

वाघापूर (ता अकोले) येथे संयुक्त जयंती उत्सव साजरा

आमदार लहामटे यांचे हस्ते विकास कामांचे लोकार्पण

नविन पाणी निर्माण केल्याशिवाय पठार भागाला पाणी देणारे नाही- आमदार लहामटे

अकोले प्रतिनिधी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महात्मा जोतिबा फुले यांचा संयुक्त जयंती उत्सव वाघापूर ता अकोले येथे पार पडला अध्यक्षस्थानी माजी सरपंच सिताराम लांडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. किरण लहामटे हे होते

घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित,बहुजन, आदिवासी अशा सर्वांसाठीच काम केले दुर्बलांसाठी आरक्षण दिले दुर्बलांना सबल करण्याचे मोठे काम त्यांनी केले . त्यांचे कार्यकर्तृत्व प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे आहे असे सांगत
वाघापूर येथील मुळा नदीवर पूल, लिंगदेव येथील एम आय डी सी तसेच सिद्धार्थ नगर मधील रस्ता करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले तसेच मुळा नदीत नवीन पाणी निर्माण दिले केल्याशिवाय संगमनेर तालुक्यातील पठार भागाला पाणी योजनेचे पाणी देणार नाही असे यावेळीआमदार डॉ किरण लहामटे यांनी सांगितले

आमदार डॉ किरण लहामटे यांच्या निधीतून सिद्धार्थनगर येथे बांधण्यात आलेल्या तीस लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे तसेच सात लाख रुपये खर्चाच्या समाज मंदिर बांधकामाचे लोकार्पण प्रसंगी आमदार लहामटे यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी सिताराम लांडे, राहुल गायकवाड, रोहन गायकवाड मारुती लांडे, सुरेश गायकवाड,सुनील डोळस, पत्रकार सुनील गीते,सखाराम लांडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले

याप्रसंगी सरपंच रंजनाताई बराते, माजी सरपंच मंदाताई बराते,संजय औटी, उपसरपंच महेंद्र बराते,मिलिंद जाधव, गुलाब जगताप, योगेश लांडे,श्रीकांत गायकवाड ,रवी गायकवाड, शुभम निकाळे, विनोद शिंदे, वाघापूर सोसायटीचे सचिव संजय फुलसुंदर, धम्मपाल निकाळे, सुनील रकटे,संजय जगताप, प्रदीप जगताप, बंटी जगताप, साहिल जगताप, महादू लांडे,मनेश गायकवाड, अनिल जाधव,धनंजय रकटे, युवराज गायकवाड, प्रियंका शिंदे, संध्या शिंदे, गणपत बराते, कुंडलिक गंभीरे, हिरामण गंभीरे, भरत गंभीरे,राजेंद्र गंभीरे, मारुती वाजे, सखाराम गंभीरे, बाबाजी रकटे सोपान रकटे, रोहिदास आरोटे, संतोष लांडे, म्हतू लांडे, भागवत बराते, स्वप्नील आवटी, विशाल बराते, दादाभाऊ वाघमारे,जितेंद्र बराते,सावरगावकर, बाळासाहेब निळे,शुभम लांडे, ऋषिकेश लांडे, किरण जगधने,पप्पू भालेराव, राजेश, देठे, देवराम खरात, रावसाहेब लांडे,समाधान औटी आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सूर्यभान शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर ,भीमराज रकटे . यांनी आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button