नाशिक रोटरी कडून परसबाग व गच्चीवरील बाग कार्यशाळेचे आयोजन.”

नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत उदोजी शैक्षणिक संग्रहालय परिसर, गंगापूर रोड, नाशिक येथे “परसबाग लागवड व गच्चीवरील बाग” या विषयावरील विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेत तज्ज्ञांकडून परसबागेचे नियोजन, कुंड्या व ट्रे तयार करणे, माती व खतांचे योग्य मिश्रण, भाजीपाला व फुलझाडांची लागवड, झाडांची निगा, कीड-रोग व्यवस्थापन तसेच पाणी व्यवस्थापन याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे.कार्यशाळा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकविण्यास इच्छुक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ९८८१८६७९७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.



