इतर

कोतुळ येथील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. देविदास दादा देशमुख यांचे निधन;

कोतुळ /प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील ज्येष्ठ विधिज्ञ व अकोले तालुका वकील संघांचे माजी अध्यक्ष अॅड. देविदास दादा देशमुख (वय 78 वर्ष )यांचे आज पहाटे नाशिक येथे उपचारा दरम्यान निधन झाले.

‘नवरदेव’ चित्रपटाचे निर्माता पत्रकार निरंजन देशमुख, शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले वैभव देशमुख यांचे ते वडील होत.

अॅड. देशमुख यांनी अकोले- संगमनेर तालुक्यात वकिली व्यवसाय केला . मूळचे कोतुळ येथील रहिवासी असल्याने त्यांनी शेती व्यवसायही सांभाळत कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. आपल्या
मुलांच्या शिक्षण व जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले. विधिज्ञ म्हणून काम करताना सामाजिक
बांधिलकी जपत त्यांनी अनेक सामाजिक संस्थामध्ये काम केले

त्यांच्या निधनाने कोतुळ परिसराने एक अनुभवी विधीज्ञ, समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व आणि मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, गोपीनाथ देशमुख , सुभाष देशमुख ,दत्तात्रय देशमुख असे तीन बंधू , निरंजन देशमुख, व वैभव देशमुख असे दोन मुले यांच्यासह सुना नातवंड असा मोठा परिवार आहे.

अॅड. देविदास देशमुख यांच्या पार्थिवावर
आज त्यांच्या मूळ गावी कोतुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शिक्षण, वकील, राजकीय,सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button