इतर

महालक्ष्मी विद्यालय शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रा.सचिन लगड तर उपाध्यक्षपदी नवनाथ जाधव यांची निवड.


अकोले /प्रतिनिधी-

अकोले तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भाग म्हणून ओळख असलेल्या तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये तालुक्यात प्रथम मानांकन प्राप्त केलेल्या पिंपळगाव नाकविंदा येथील महालक्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रा.सचिन किसन पाटील लगड तर उपाध्यक्षपदी नवनाथ नारायण जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
येथील विद्यालयात विद्यालयाचे प्राचार्य सुनिल धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली पालक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची नुकतीच सहविचार सभा संपन्न झाली.या सहविचार सभेत वरील निवडी एकमताने संमत करण्यात आल्या.
या समितिवर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांसह एकूण पंधरा अन्य सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे.
सचिवपदी प्राचार्य सुनिल धुमाळ, शिक्षक प्रतिनिधि रामदास कासार, पालक प्रतिनिधी देवराम लक्ष्मण बगनर, संदीप गणपत वाळके,कृष्णा विठ्ठल तातळे, संदीप माधव आभाळे, गोरक्ष रामा चावडे,अर्जुन हरिभाऊ लगड, सविता नवनाथ लगड,अश्विनी अक्षय शिंदे,स्वाती दिनेश मुंढे,कविता मारूती बगनर, मंदा पोपट सदगीर आदिंची एकमताने निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड वसंतराव मनकर, सचिव मंगेशराव नवले, ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण सोंगाळ, उपसरपंच मारूती काळे,सर्व सदस्य, पोलीस पाटील चंद्रकांत लगड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बबनराव आभाळे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब लगड, स्थानिक स्कुल कमिटिचे अध्यक्ष मारूती आभाळे,पालक, शिक्षक तसेच नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे.
यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांनी पालकांच्या विविध समस्या समजावून घेतल्या तसेच योग्य मार्गदर्शन करून सर्व समस्यांचे निरसन केले.
यावेळी शिक्षक प्रतिनिधी रामदास कासार यांनी सामितीचा उद्देश तसेच ध्येय व धोरणे याविषयी माहिती दिली. याप्रसंगी सुत्रसंचलन केले तसेच उपस्थितांचे आभार मानले.

शैक्षणिक,सामाजिक,राजकीय आणि विकासात्मक कार्यात सक्रिय असणाऱ्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निश्चितच उपयोग होईल. विद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना देणे तसेच पालक- शाळा समन्वय अधिक दृढ करण्यासाठी ते प्रभावी योगदान देतील

– प्राचार्य सुनिल धुमाळ

स्थानिक समुदाय, पालक आणि शिक्षकांचा शालेय कामकाजात सहभाग वाढवणे आणि शाळेचा सर्वांगीण विकास करणे हा या समितीचा मुख्य उद्देश आहे. एकतर शाळा गावात पाहीजे नाहीतर ग्रामस्थांनी वेळोवेळी शाळेत गेले पाहीजे असे असले तर निश्चितच त्या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागते.यानुसार गुणवत्तेत अधिक भर देण्यासाठी पुर्णपणे प्रयत्न करील-

प्रा.सचिन लगड, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button