इतर

अकोल्यात जिल्हा बँकेच्या ठरावाचा 51 हजारचा लिलाव!

कोतुळ प्रतिनिधी 

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची  रणधुमाळी सुरू झाली आहे बँकेची सभासद यादी निश्चित  करण्यासाठी सहकारी संस्थांकडून प्रतिनिधीचे ठराव मागितले आहे  जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकारी संस्थांच्या वतीने   मतदान करणे, निवडणुकीत उभी राहणे, सूचक, अनुमोदक होणे यासाठी प्रतिनिधी पाठवण्याचे ठराव सहकारी संस्थांचे ठराव करण्यात आले 16 जुलै2026  रोजी हे ठराव देण्याची अंतिम तारीख होती

  अकोल्यातील सहकारी संस्थांचे ठराव होण्यासाठी मोठी रस्सीखेच झाली  राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार डॉ किरण लाहमटे आणि जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सिताराम पाटील गायकर   तसेच  भाजपा चे माजी आमदार वैभवराव पिचड व जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक अमित भांगरे अशा लहामटे आणि  पिचड- भांगरे अशा दोन्ही गटांकडून आपापल्या समर्थकांचे ठराव करण्याचा प्रयत्न केला आपल्याच बाजूने ठराव होण्यासाठी संचालक, सभासदांना मॅनेज करण्याची कसरत   दोन्ही गटांना करावी लागली  अकोले तालुक्यातील सहकारी सेवा संस्था, कृषी सहकारी संस्था  तसेच बिगर कृषी सहकारी संस्था, दूध सहकारी संस्था  अशा वेगवेगळ्या संस्थांची ठराव 16 जुलै रोजी सहकारी  संस्था  सहाय्यक निबंधक अकोले यांच्याकडे दाखल झाले 

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर निबंधक तसेच जिल्हा  निबंधक (दुग्ध) अहिल्यानगर यांच्याकडे प्राप्त झालेले सहकारी संस्थांचे ठराव जिल्हा बँकेकडे सादर केले जाणार आहेत त्यानंतर जिल्हा बँकेकडून  मतदारांची प्रारूप मतदार यादी  प्रसिद्ध   करून त्यावर हरकती मागविण्यात येणार आहेत अंतिम मतदार यादी नंतर जिल्हा बँकेची रणधुमाळी सुरू होणार आहे 

 निवडणुकी निमित्ताने जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी सुरू होणार आहेत यात पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे  पाटील सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात  यांच्या प्रतिष्ठेचीही ही निवडणूक होणार आहे 

 निवडणुकीपूर्वीच ठरावांवरून गावोगाव राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे आपल्याच नावाचा ठराव होण्यासाठी  गावोगावी रणकंदन पहावयास मिळाले

अकोल्यातील सहकाराला  दिशा देणाऱ्या  आंभोळ (तालुका अकोले) येथे तर  एका दूध संस्थेत जिल्हा बँकेच्या ठरावावरून मोठी चढाओढ  दिसून आली  या संस्थेत जिल्हा बँकेसाठी  आपल्याच नावाचा ठराव करावा यासाठी 51 हजार रुपयाची बोली लागली गेली . या बोली ची रक्कम  संस्थेच्या  इमारत बांधकामा साठी वापरणार असल्याचे  कारण पुढे करण्यात आले 

  प्रतिस्पर्धीने  41 हजार रुपये पर्यंत  बोली लावली तर ज्याचे नावाने ठराव मंजूर करण्यात आला त्याचे कडून 51,000 ची बोली फायनल करण्यात आली . यावरून ठरावाची प्रतिष्ठा पणाला  लागल्याचे दिसून आले मात्र ठराव घेण्यासाठी, पदाचा लिलाव करण्यासाठी सहकारी संस्था  1960 च्या अधिनियमांमध्ये ठरावासाठी बोली लावण्याचा असा कुठलाही  नियम नसताना  अशा प्रकारे झालेला ठरावाचा लिलाव मात्र चर्चेचा विषय ठरलेला आहे ठराव घेण्यासाठी अशा प्रकारचा पैशाचा व्यवहार करणे संस्थेच्या कागदोपत्री कुठलाही प्रकारे नोंदवता येत नाही मग झालेला व्यवहार कसा दाखविणार आणि हा व्यवहार कायदेशीर रित्या कसा पूर्ण होणार  यामुळे  हा ठराव कितपत वैद्य ठरतो यावर आता आगामी काळात दिसून येणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button