आजचे पंचांग व राशी भविष्य दि. १७/०७/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: आषाढ २६ शके १९४८
दिनांक :- १७/०७/२०२६,
वार :- भृगवासरे(शुक्रवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०३,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०७:०८,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति ०६:२८, चतुर्थी २८:४३,
नक्षत्र :- मघा समाप्ति १८:३५,
योग :- व्यतीपात समाप्ति २२:४६,
करण :- वणिज समाप्ति १७:३०,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – पुनर्वसु,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयतिथी वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:५७ ते १२:३५ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:४१ ते ०९:१९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:१९ ते १०:५७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:३५ ते ०२:१३ पर्यंत,
❀ दिन विशेष:
विनायक चतुर्थी, करिदिन, गुरु पश्चिम लोप, भद्रा १७:३० नं. २८:४३ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ २६ शके १९४८
दिनांक = १७/०७/२०२६
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
ऐनवेळी निर्णय घ्यावे लागतील. आजचा दिवस आनंददायी ठरेल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. मौजमजेत वेळ घालवाल. कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न कराल.
वृषभ
शांत चित्ताने कामे करावीत. कलहाचे प्रसंग टाळावेत. आरोग्य चांगले राहील. छुप्या शत्रूंवर मात करता येईल. कामात मन रमेल.
मिथुन
शब्दाने शब्द वाढवू नका. वैचारिक ताण घेऊ नका. बौद्धिक हटवादीपणा टाळावा. बोलतांना संयम सोडू नका. चांगल्या कामासाठी अधिक वेळ काढावा.
कर्क
गोड बोलून कामे करून घ्याल. घरातील वातावरण खेळकर राहील. घरगुती कामात अधिक वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वादाचे प्रसंग समजुतीने हाताळा.
सिंह
मनातील इच्छाशक्ति प्रबळ ठेवा. आज बरीच कामे हातावेगळी करता येतील. यश पदरात पडून घ्याल. जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. भावंडांचे प्रेमळ सौख्य वाढेल.
कन्या
कामात धरसोडपणा करू नका. दिवसभर कामाची धांदल राहील. कौटुंबिक गोष्टींसाठी वेगळा वेळ काढावा लागेल. इतरांना मदत करण्यात आनंद वाटेल. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल.
तूळ
मनात हेतु ठेवून कामे कराल. मोठ्या योजनांची आखणी कराल. मनाच्या मर्जीला अधिक महत्त्व द्याल. दिवस चैनीत घालवाल. आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे.
वृश्चिक
सडेतोड उत्तरे द्याल. दिवस काहीसा धावपळीत जाईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. येणी वसूल करावी लागतील. काही निर्णय घेताना त्रस्तता जाणवेल.
धनू
माणसे ओळखून वागावे. अध्यापक वर्ग दिवसभर कामात गर्क राहील. नोकरदार वर्गाला लाभ होईल. व्यापार्यांना चांगला लाभ मिळवता येईल. अधिकारात वाढ होईल.
मकर
कामाची योग्य रूपरेखा ठरवावी. सहकार्याने कामे करावीत. हातातील अधिकार वापरता येतील. स्वावलंबनाची कास धरावी. पोटाचे त्रास संभवतात.
कुंभ
लोक निंदेला घाबरू नका. अति शिस्तीचा बडगा करू नका. आपलेच मत खरे करण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. भडक शब्दांचा वापर टाळावा लागेल.
मीन
हित शत्रूंवर मात करू शकाल. अचानक धनलाभाची शक्यता. नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी. पित्त विकारांचा त्रास संभवतो. खाण्या-पिण्याची योग्य पथ्ये पाळावीत.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

