संगमनेर प्रतिनिधी
लोकसभागातून शाळांच्या गुणवत्ता उंचावण्यास निश्चित हातभार लागतो.शाळा,पालक आणि समाज यांच्या नात्यातून शाळांच्या विकासाला हातभार लागतो असे प्रतिपादन नान्नज दुमाला येथील केंद्रप्रमख सुनील घुले यांनी केले.ते पारेगाव खुर्द येथे राहूल व सोमनाथ व्हडगर यांच्या परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांनी मोफत शालेय बॅगा व वहया वाटप प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सखाहरी शरमाळे हे होते.
आपल्या भाषणात घुले म्हणाले की,जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता उंचावते आहे.शिक्षक अधिक कार्यक्षमपणे काम करता आहेत.शाळांचे चित्र बदलत आहे.येथील शिक्षक अधिक गुणवत्तेने सरकारी सेवेत आलेले आहेत.त्यांना सातत्याने प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले जाते आहे.सरकारी योजनांचा प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रेरित करून शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रियता निर्माण केली जात आहे.अशावेळी पालक,समाजाने या विकासात सहयोग दिल्यास शिक्षणाच्या गुणवत्तेत निश्चित वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला.विद्यार्थ्यांच्या समग्र विकासाबरोबर अवांतर वाचन,शारीरिक विकासाकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे.विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळा करत असलेल्या प्रयत्नाबददल कौतुक करत त्यांनी लोक देत असलेल्या सहकार्याबददल कौतुक केले.यावेळी अध्यक्ष सखाहरी शेरमाळे म्हणाले की,शाळेच्या विकासासाठी पालक.समाजाने अधिकाधिक योगदान देण्याची गरज आहे.सरकारी शाळांमधून मिळणारे शिक्षण अधिक समृध्द आणि जीवन उपयोगी आहे.शाळा जितकी समृध्द होईल तितक्या मोठया प्रमाणावर शिक्षणाची गुणवत्ता उंचावणार आहे.त्यामुळे गावातील जिल्हा परिषद शाळा विकासासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन केले.राहूल व सोमनाथ व्हडगर यांनी वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिलेले योगदान अधिक कौतुकास्पद आहे.यावेळी राहूल व्हडगर यांनी त्यांचे वडील गजेराम रखमा व्हडगर यांच्या स्मरणार्थ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि वह्या वितरित करण्यात आल्या.यावेळी त्यांच्या मातोश्री आशाताई व्हडगर,सुमनबाई व्हडगर,शिलाबाई व्हडगर,विजय व्हडगर,महेश उदमले उपस्थितीत होते.
यावेळी शाळेसाठी लागणारी मदत करण्याचे आश्वासन पालक वर्गाच्या वतीने देण्यात आले.कार्यक्रमास सुनील मोकळ,सोमनाथ व्हडगर,पांडूरंग सानप,रामनाथ मोकळ,संदीप काळे,भाऊसाहेब मोकळ,मिलींद मोकळ,अरूण मोकळ,कारभारी घुगे,वैभव सोडणर,नितीन हलवर,काकासाहेब जगताप,बाबासाहेब मोकळ,किरण मोकळ,पोपटराव मोकळ,भाऊपाटील घुगे,किरण मोकळ यांच्यासह मोठया संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सौ.अर्चना शिरसाठ यांनी मानले.

