सुरक्षा रक्षक कामगारांचे पगार देण्याची टाळाटाळ करणाऱ्या कपंनीचे लायसन रद्द करावे

रयतराज्य संस्थेने केली कामगार आयुक्ताकडे मागणी
ठाणे प्रतिनिधी
ठाणे येथील Marshan Innovative Security Pvt.
Ltd. या सुरक्षा कर्मचारी पुरवठा करणाऱ्या कंपनीने सुरक्षारक्षकांचे अनेक दिवसापासून चे पगार थकवले आहे सदर पगार देण्यास कंपनी टाळाटाळ करत असून या कंपनी विरुद्ध कर्मचाऱ्यांनी कामगार आयुक्तांकडे दाद मागितली आहे पगार देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपनी वर कारवाई करून कंपनीचे लायसन रद्द करावे अशी मागणी रयत राज्य या सामाजिक संस्थेने कामगार आयुक्तांकडे केली आहे
डोंबिवली रूनावल मायसिटी, फेस–५ येथे रूनावल यांच्या संगनमताने सुरक्षा रक्षक पुरवठा ठेका माहे एप्रिल मे मध्ये घेवून एकुण २२ सुरक्षा रक्षक कार्यरत करून त्यांना गेले तीन महिने पगार न देता जिवे मारण्याच्या धमक्या देऊन पगार देण्यास विलंब टाळाटाळ, फसवणुक करीत असल्याने
रूनावल येथील अनामत रक्कम गोठावून कामगारांना फसवत असल्याचे त्यांचे लायसन्स जप्त करून कामगारांना न्याय व सुरक्षा द्या. अन्यथा सनदशीर मार्गाने जन आंदोलन पुकारावे लागेल असा इशारा रयत राज्य चे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ धुरदेव व आर पी आय चे युवा नेते विजय पवार यांनी दिला आहे
ठाणे जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात विकास कामे सुरू असून अनेक खाजगी सुरक्षा कंपन्या सुरक्षा रक्षक पुरवण्याचे कामा चा ठेका घेतात. त्यामध्ये अनधिकृत पध्दतीने पसारा परवान्याचे गैरवापर होवून अनेक गोरगरिब, बेरोजगार आर्थिक शोषणास बळी पडतात. त्यांचे संसार उध्दवस्त होतात. फर्स्ट पार्टी, थर्ड पार्टी अशी सरकारी पसारा
लायसन्सची गैरवापर करून सुरक्षा रक्षकाचा पगार वेळो वेळी न देता अनधिकृत दलाल फरार होतात.
त्यामुळे कामावर ठेवलेले अनेक सुरक्षा रक्षक मुळ कंपनीमध्ये नोंद नसल्याने पगारापासून वचित होऊन कुटुंब उध्दवस्त होतात.
डोंबिवली येथील रूनावल माय सिटी फेस-५ येथे रूनावलच्या वतीने एमआयएस कंपनीला सुरक्षा रक्षक पुरवण्याचे काम दिले होते. त्यांची देखरेख संतोष राऊत उर्फ जैसवार, कंपनीचे मालक मैनेजर सुरज मुलानी, यांनी सर्व कामगारांना कामावर येण्याचे तोंडी आदेश दिले. मुळ पंधरा दिवसाचा पगार कपडयाचे पैसे कामाला लावण्याचे पैस
असे अनेक पैशाची कपात करून पगार दिला. मात्र पंधरा दिवसाचे कामाचे पैसे असल्याने पूर्ण महिना काम करावे लागेल नाहीतर पगार पैसे देणार नाही अशी कंपनीच्या वतीने धमकावण्यात आले. त्यामुळे मजबुरीने महिना भरून त्यांचे ठेका संपुष्टात आला. मात्र महिना भर काम करून तुम्हांला पगार पुढील १० तारखेला देऊ असे सांगून नंतर सर्व मंडळी फरार झाली. ऑफीसकडे गेलो तर ऑफीसचे सुरक्षा रक्षक आत जावू देईना. फोन केला तर फोन ब्लॉक केले. त्यामुळे दिनांक १५/०६/२०२६ रोजी श्रीनगर पोलीस स्टेशन गाठावे लागले. त्यानंतर आम्हांला मॅनेजर सुरज मुलानी यांनी भेट देवून तुम्हाला एक महिन्यानंतर पगार तुमच्या खात्यामध्ये पाठवू. तुम्हांला येण्याची गरज नसल्याचे सांगून आजतागायत पगार नाही, पैसे नाही तेव्हा मुलानी यांना फोन केला
असता उलट उत्तरे मिळाली. तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्ही पोलीस घेवून आले होते. आता पोलीस घेवून या अशा प्रकारे आमची चेष्टा व आर्थिक शोषण करत
असल्यने कंपनीवर तातडीने कारवाई करून कामगारांना न्याय देवून सन्मान द्यावा अशी मागणी केळी असून निवेदन
कामगार मंत्री ना.श्री. आकाश पांडुरंग फुंडकर यांना पाठविले आहे दरम्यान महादर्पण प्रतिनिधी ने कंपनी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही



