अकोले तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधनांचे वाटप

अकोले प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आनंद भंडारी यांच्या प्रेरणेने व शिक्षणाधिकारी श्री.भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका संसाधन कक्ष अकोले मुले येथे अकोले तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधनांचे वाटप करण्यात आले
सदर कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व केंद्रातील पात्र दिव्यांग विद्यार्थी/लाभार्थी पालक शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. समावेशित शिक्षण विभाग पंचायत समिती अकोले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात 1 ली ते 8 वी च्या 43 दिव्यांग विद्यार्थ्यांना व अंगणवाडीच्या 5 विद्यार्थ्यांना साहित्य साधने वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब दोरगे विस्तार अधिकारी श्री राजेश पावसे, श्रीम.सविता कचरे,श्री संभाजी झावरे, श्री ज्ञानेश्वर माळवे,श्री जनार्दन भवरे, श्री अनिल गायकवाड, श्री अरविंद कुमावत, श्रीम सुरेखा फापाळे व केंद्रप्रमुख श्री बाळासाहेब आरोटे,श्री काळुजी भांगरे, श्री रमेश झोळेकर,श्री विजय भांगरे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गट विकासअधिकारी श्री दोरगे यांनी तालुक्यातील मोठ्या संख्येने उपस्थित पालक शिक्षक विद्यार्थ्यांना सखोल विशेष व सर्व समावेशक मार्गदर्शन करून विद्यार्थी पालकांना अपेक्षित मदत व सहकार्याबाबत आश्वासित केले. उपस्थित सर्व पालकांना मान्यवरांनी साहित्य वाटप केले यावेळी पालक व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह व आनंद सर्व काही सांगून जात होता.जि. प. प्राथ शाळा जाचकवाडी येथील दिव्यांग विद्यार्थी कु पार्थ फापाळे यास साहित्य मिळाल्यावर त्याच्या आई वाडिल आनंदित झाल्याचे शिक्षिका श्रीमती नलिनी जटाडे व श्रीमती आरोटे यांनी सांगितले.
साहित्य वितरणाच्या कार्यक्रमासाठी केंद्रस्तरीय विशेष शिक्षक श्री राहुल देशमुख श्री कैलास झोळेकर श्री ज्ञानेश्वर शेंडगे श्रीम रंजना कराळे श्रीम सीमा कानवडे श्री दत्ता क्षीरसागर श्री विठ्ठल धांडे श्री दीपक भांगरे श्री संदीप कडवे श्री महेश मोहिते श्री संकेत देशमुख श्री किशोर खेमनर श्री महेश काळे काळजीवाहक श्रीम गडाख श्रीम झोळेकर यांनी नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राहुल देशमुख व आभार श्री कैलास झोळेकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशसस्वीते साठी सर्व केंद्रस्तरीय विशेष शिक्षक व काळजीवाहक यांनी मेहनत घेतली.
दिव्यांग विद्यार्थ्यांचा साहित्य वाटप कार्यक्रम हा माझ्या जीवनातील विशेष कार्यक्रम असून तालुक्यातील पात्र दिव्यांग विद्यार्थ्याना साहित्य मिळाल्यावर पालकांनी आनंद व्यक्त केला. त्यांचा आंनद हाच आमचा आनंद असून पुढील काळात दिव्यांगांना असलेल्या सर्व सोई सुविधा मिळवून देण्यास आम्ही कटिबद्ध असू
— श्री बाळासाहेब दोरगेगटशिक्षणाधिकारी पं स अकोले
दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळालेले साहित्य हे त्यांच्या दैनंदीन जीवनात उपयोगी पडून दिव्यांग पुनर्वसनास सहाय्य करणारे आहे. त्यांचे पुनर्वसन हेच आमचे लक्ष असून पुढील काळात शासनाच्या सर्व पात्र योजनांचा लाभ आम्ही त्यांना देऊ..
–श्री राहुल देशमुख
केंद्रस्तरीय विशेष तज्ञ ब्राह्मणवाडा

