अहमदनगर

संगमनेर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर



तालुकाध्यक्षपदी अजय फटांगरे, शहराध्यक्षपदी सोमेश्वर दिवटे; कार्याध्यक्षपदी अमोल शेलकर यांची निवड



संगमनेर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियान अंतर्गत संगमनेर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अजय नारायण फटांगरे यांची संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी, सोमेश्वर सूर्यभान दिवटे यांची शहर काँग्रेस अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती, तर अमोल भारत शेलकर यांची संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या.

संघटन सृजन अभियानांतर्गत प्रदेश काँग्रेसने राज्यभर निरीक्षकांमार्फत विविध जिल्ह्यांमध्ये पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यातून प्राप्त झालेल्या शिफारशींचा विचार करून ब्लॉक अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

नवनियुक्त तालुकाध्यक्ष अजय नारायण फटांगरे हे युवक काँग्रेसपासून पक्षात सक्रिय असून त्यांनी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.

शहराध्यक्ष म्हणून पुन्हा संधी मिळालेले सोमेश्वर सूर्यभान दिवटे हे युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले. ते सध्या संगमनेर नगर परिषदेचे नगरसेवक असून शहरातील संघटनात्मक कामात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

कार्याध्यक्षपदी निवड झालेले अमोल भारत शेलकर हे २०१० पासून काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. विविध जनआंदोलनांमधील सक्रिय सहभागामुळे त्यांची काँग्रेसचा आंदोलनशील चेहरा अशी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे पक्षाने नव्या दमाच्या तरुण नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला असल्याचे मानले जात आहे.

या नियुक्त्यांचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते  बाळासाहेब थोरात यांनी स्वागत करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. काँग्रेसचा शाश्वत व लोकशाही आणि राज्यघटना वाचवणारा विचार अधिक प्रभावीपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही नवी टीम जोमाने कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या नवीन पदाधिकाऱ्यांचे मा महसूल मंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मा.आ. डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात, पांडुरंग पाटील घुले, रणजीतसिंह देशमुख, ॲड माधवराव कानवडे, शंकरराव खेमनर,सुधाकर जोशी, इंद्रजीत भाऊ थोरात,संपतराव डोंगरे, बाबा ओहोळ, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, राजेंद्र गुंजाळ, निखिल पापडेजा , सुभाष सांगळे, हैदर आली, गौरव डोंगरे, सौ अर्चनाताई बालोडे, सौ पद्माताई थोरात विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button