इतर

आदिवासी विकास विभागातील २५०० शिक्षकांची भरती तात्काळ करणार,आदिवासी विकास मंत्री ना.अशोक उईके

अकोले प्रतिनिधी 

  आदिवासी समाजाच्या मूलभूत समस्या बाबत आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. अशोक  उईके यांच्या लोहगड बंगल्यावर आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र शाखेची बैठक प्रदेशाध्यक्ष रामसाहेब चव्हाण यांच्या नेतृत्वात संपन्न झाली. या बैठकीत आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त आदिवासी विकास विभाग ,उपसचिव, कक्ष अधिकारी उपस्थित होते, तसेच इतर ही विभागाचे सचिव,उपसचिव  हजर होते, व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा महाराष्ट्रातील अप्पर आयुक्त ठाणे, नाशिक ,अमरावती ,नागपूर व सर्व प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. 

या बैठकीत मंत्री महोदया समोर महाराष्ट्रातून आलेल्या परिषदेच्या राज्य महासचिव, सचिव, जिल्हाध्यक्ष  विभाग अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शाखा प्रमुख हजर होते. यांनी आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक ,आर्थिक ,योजनाविषयक ,आदिवासी कर्मचारी अधिकारी, निवेदन दिले.आदिवासी समाजा वर होत असलेल्या अन्याय दूर करणे बाबत निवेदन सादर केले .तसेच पेसाभरती ,बिंदू नामावली, बोगस आदिवासी, आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी भरती, भूमीहीन आदिवासी बांधव यांना जमीन पट्टे वाटप,  विद्यार्थी शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा,परदेशी शिक्षण शिक्षणासाठी उत्पन्नाची अट शिथिल करणे,वैमानिक शिक्षण हवाई सुंदरी प्रशिक्षण ,वैयक्तिक , सामूहिक लाभाच्या कल्याणकारी योजना ,आदिवासी ठेकेदारांना 50 टक्के काम देणे, विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात पूर्वीप्रमाणे भोजन व्यवस्था सुरू करावी. अशा विविध आदिवासी समाजाचा विकासा बाबतच्या मुद्द्यावर मंत्री महोदयांनी सतत तीन तास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या समस्या तातडीने दूर करण्याबाबत उपस्थित शासकीय अधिकारी यांना आदेशित केले .व  व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन याबाबतची अंमलबजावणी तात्काळ करण्याकरता निर्देशित केले.

 या राज्यस्तरीय बैठकीत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने माजी आमदार व परिषदेचे जेष्ठ प्रदेश उपाध्यक्ष वैभवराव पिचड ,प्रदेश महासचिव केशवराव तिराणिक, प्रदेश सचिव इंजि. शेषराव कोवे, मुंबई व कोकण विभागीय अध्यक्ष रामनाथ भोजने, अमरावती विभागीय अध्यक्ष माधवराव वैद्य, महाराष्ट्र प्रदेश महिला कार्याध्यक्ष सौ वर्षाताई आत्राम, प्रदेश महिला महासचिवसौ.जयमाला तिराणिक, यवतमाळ जिल्हाध्यक्ष ॲड. सुनील ढाले,अमरावती जिल्हाध्यक्ष अशोकराव चव्हाण, अमरावती विभागीय महासचिव डॉ. तुषार आत्राम नांदेड जिल्हाध्यक्ष प्रा.विजय खुपसे,सोलापूर जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ काळे, देविदास काळे, बंडू मेश्राम,भोला मडावी,किशोर सलामे,राज विलास किनाके, सुभाष गेडाम, सौ मीरा भोईर सविता ससाने, अशोक मेश्राम ,नागिन काळे व मोठ्या संख्येने आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button