कृषिभूषण सयाजीराव पोखरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप…


*कोतूळ. प्रतिनिधी
*कोतूळ पंचक्रोशीतील प्रयोगशील शेतकरी, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त श्री.सयाजीराव पोखरकर यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त कोतूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रेणुकानगर प्राथमिक शाळेतील मुलांना स्कूल बॅग/दप्तर या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले
चिमुरड्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील आशेचा किरण जागवण्याचे काम करण्यात आले, ही आठवण छोटी छोटी मुले कदापिही विसरणार नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावरचा विशेष आनंद आज दिसून येत आहे. पोखरकर परिवाराने कृषी संस्कृती बरोबरच सामाजिक जबाबदारी नेहमीच जपली आहे, असे प्रतिपादन रेणुकानगर येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन फुलसुंदर यांनी यावेळी व्यक्त केले.

*महाराष्ट्र शासनाच्या शेतीमित्र आणि कृषीभूषण पुरस्काराने गौरविलेले प्रयोगशील शेतकरी सयाजीराव पोखरकर यांचा 62 वा वाढदिवस आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपा बरोबरच यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत पोखरकर,आंभोळ येथील आमलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष उत्तमराव साबळे, कोतुळ ग्रामपंचायतचे माजी सदस्य रामनाथ आरोटे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय पोखरकर, कृषिभूषण सयाजीराव पोखरकर, भाऊसाहेब पोखरकर , रोशन आरोटे,दिलीपराव साबळे, शाळेचे मुख्याध्यापक सचिन फुलसुंदर, शिक्षिका मनीषा गंभीरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोखरकर,अमित देशमाने,राहुल आरोटे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



