नेप्तीत वेताळ बाबा यात्रा उत्सव संपन्न, आमटी भाकरीच्या महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ

अहिल्यानगर (प्रतिनिधी)
नगर तालुक्यातील नेप्ती पंचक्रोशीतील भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या श्री वेताळ बाबा महाराजांच्या भंडाऱ्याचा उत्सव सोहळा अत्यंत भक्तीमय आणि उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री वेताळ बाबा मित्र मंडळ व द किंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे भंडाऱ्याचे ९ वे वर्ष आहे असल्याची माहिती रामदास फुले यांनी दिली.
वेताळ बाबां महाराजांना १०८ भोग महाप्रसाद दाखविण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी उपस्थित राहून श्री वेताळ बाबा यांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
गावाच्या परंपरेनुसार यंदाही भाविकांसाठी आमटी, भात, शिरा आणि बाजरीची भाकरी असा महाप्रसाद देण्यात आला. नेप्तीतील या भंडाऱ्याचे विशेष आकर्षण असलेली आमटीभाकरी ही परंपरा कायम राखण्यात आली. दूरदूरच्या गावांतून आलेल्या भक्तांनी मोठ्या आनंदात महाप्रसादाचा लाभ घेतला.
रविवारी पहाटे ४ वा. ध्वजारोहण ,पहाटे ४:४५ वा. धुनी प्रज्वलन, सकाळी ९ वा. ६००० कलश अभिषेक, दुपारी १२:१५ मिनिटांनी पुष्पा अर्चन, दुपारी १:३० वा. होम व हवन, सायंकाळी ५ वा. महाआरती ,सायंकाळी ६ वा. महाप्रसादाचे वाटप व रात्री ८ वा. भजनाचा कार्यक्रम झाला. भंडाऱ्यानिमित्त मंडळातील कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून ‘सार्वजनिक स्वच्छता हीच खरी सेवा’ असा संदेश दिला. मंदिर परिसर फुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी नटले होते. वेताळ बाबा मित्र मंडळाच्या सदस्यांनी वेताळ बाबा महाराजांचा अभिषेक केला.
गुरुवर्य औघड पीर नौमिनाथजी गुरु योगी सोमवारनाथजी महाराज पंथ संतनाथ यांच्या हस्ते महाआरतीचा कार्यक्रम झाला. यावेळी संदीपजी महाराज पवार , मंगलनाथ महाराज, मस्तनाथ महाराज, मलंगनाथ महाराज, शैलेंद्रनाथ महाराज, आकाशनाथ महाराज, दर्शन तुपे महाराज उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नेप्तीचे माजी सरपंच अंबादास पुंड, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले, समता परिषदेचे अध्यक्ष शाहूराजे होले, सौरभ भुजबळ, मंडळाचे अध्यक्ष तुषार भुजबळ, प्रा. भाऊसाहेब पुंड, सागर शिंदे, नितीन पुंड, नितीन शिंदे, तेजस नेमाने, संकेत भुजबळ, कुणाल शिंदे, वैभव बेल्हेकर, ओमकार भुजबळ, सार्थक होले, संकेत कर्पे, हर्षल चौरे, आदित्य पुंड, सिद्धी शिंदे, विनायक बेल्हेकर, शिवम सप्रे, प्रशांत रावळे, अमित दरेकर, सचिन दरेकर, बंटी मोरे, प्रणव होळकर, आर्यन टाक, कृष्णा शेरकर, समर्थ जवणे, सत्यम रावळे, आयुष राऊत, श्रीकांत रावळे मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व समस्त नाथयोगी परिवार यांनी परिश्रम घेतले.
रात्री आयोजित भजनी मंडळाच्या भजन, गवळण आणि भक्तीगीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजनरंगात तल्लीन झाले. श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचा संगम झालेल्या या कार्यक्रमाने भंडाऱ्याचा सोहळा रंगला होता.
….




