अकोले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कौशल्य पदवी प्रदान समारंभ उत्साहात साजरा

ध्येय साध्य करण्यासाठी जबाबदारी घेऊन काम केल्यास यश हमखास मिळते- अजित देशमुख
अकोले प्रतिनिधी –
आय.टी. आय.च्या विद्यार्थ्यांनी कौशल्य प्राप्त केल्यानंतर जीवनामध्ये ध्येय साध्य करण्यासाठी जबाबदारी घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने काम केले तर जीवनात यश हमखास मिळते.त्यासाठी कोणतीही सुरुवात सावधगिरीने व वाहवत न जाता चांगली करावी असे प्रतिपादन अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अजित देशमुख यांनी केले.
ते अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ऑगस्ट 2022 मध्ये अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कौशल्य पदवी प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या समारंभाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष इंजि. सुनील दातीर होते. यावेळी अकोले शहरातील यशस्वी उद्योजक सतीश चोथवे,अगस्ती चे मुख्य लेखपक एकनाथ शेळके,संस्थेचे सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख,स्था.व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशवंतराव आभाळे, कार्यकारीणी सदस्य शरदराव देशमुख, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, गट निदेशक मच्छिंद्र गायकर, सर्व निदेशक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यकारी संचालक श्री देशमुख पुढे म्हणाले की,आय टी आय ची कौशल्य पदवी घेतल्यानंतर तुम्ही आता कुशल वर्गात मोडतात,आपण आपले काम कसे करतो याचे समाज निरीक्षण करीत असतो.त्यामुळे कोण काय करतात या कडे लक्ष न देता आपले काम प्रामाणिकपणे व जबाबदारी ने करा,कमी कष्टात जास्त मिळविण्याचा प्रयत्न करू नका,कोणत्याही कामाची सुरुवात चांगली झाली तर यश हमखास मिळते.जागतिक पातळीवर भारतीय युवक कष्टाला कमी पडत नाही.आजच्या युगात पैसा चांगला मिळतो मात्र त्यासाठी धीर धरण्याची गरज आहे.प्लॅनिंग चांगले केले तर प्रगती निश्चित होते.प्लॅनिंग ने सर्व गोष्टी साध्य होतात मात्र ते तुमच्या हातात आहे.आपण आपले कौशल्य वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले.
यावेळी युवा उद्योजक सतीश चोथवे म्हणाले की,भगवान विश्वकर्माच्या जयंतीच्या दिवशी तुम्हाला मिळालेली कौशल्य पदवी ही दुग्ध शर्करा योग आहे.तुमचे जीवनात कुशाग्रता, कुशलता व कोमलता हे असावे.कोमलता म्हणजे तुम्ही समाजाप्रती नम्रपणे वागला तरच ध्येय, उद्दिष्ट साध्य होणार आहे. आताच्या युगात तुम्ही तुमच्या कौशल्यात अपग्रेड व्हावे,सतत नवीन ज्ञान अवगत करावे आणि व्यावसायिकता पाळावी तुम्हाला जीवणात कधीही अपयश येणार नाही.असे मत व्यक्त केले.
मुख्य लेखापाल एकनाथ शेळके म्हणाले की, तुमच्या कौशल्याचा फायदा औद्योगिक क्षेत्राला होत असून अनेक तांत्रिक अडचणी तुम्ही कौशल्याच्या जोरावर सोडवित आहे. आइ वडिलांचे,संस्थेचे, शिक्षकांचे आणि स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी 100 टक्के योगदान द्या,असे मत व्यक्त केले.
यावेळी शरदराव देशमुख म्हणाले की, इंजिनिअर पेक्षाही आय टी आय च्या विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी आहे.त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा. देशाची प्रगती ही तुमच्या कौशल्यावर आधारीत आहे.तुम्ही आळस करू नका,आळस केला तर प्रगती होऊच शकणार नाही.तुमच्या मध्ये लाथ मारिन तेथे पाणी काढीन अशी क्षमता आहे, मात्र त्यासाठी स्वतःला ओळखा व आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्टीला सामोरे जाणे गरजेचे आहे.
यशवंतराव आभाळे म्हणाले की, विज्ञान, तंत्रज्ञान व संगणक युगात काम करताना कुशल कामगार म्हणून चांगले काम करा, उद्याचा काळ आय टी आय च्या विद्यार्थ्याचा आहे.आज या संस्थेचे विद्यार्थी पूणे, चाकण,रांजणगाव, सिन्नर नाशिक एम आय डी सी मध्ये कार्यरत आहे ही अभिमानाची बाब आहे.
स्वागत व प्रास्ताविक करताना प्राचार्य विद्याचंद्र सातपुते म्हणाले की, एक भारत,एक अभियान, कौशल्य भारत हे साध्य करणारा वर्ग म्हणजे आय टी आय कुशल विद्यार्थी असून त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी,कौशल्याचा सन्मान व्हावा म्ह्णून हा कौशल्य पदवी प्रदान समारंभ होत आहे .अशा समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्वतःची ओळख निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला.
सूत्रसंचालन आर.के.आरोटे यांनी केले तर आभार भास्कर वैद्य यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली गट निदेशक मच्छिंद्र गायकर,निदेशक रामनाथ आरोटे,संतोष हासे,संदीप देशमुख, भास्कर वैद्य, पुरुषोत्तम नवले,बाबासाहेब धुमाळ,अरुण भालेराव,निलेश थटार,अक्षय घुले,सागर मंडलिक, सतीश वैद्य,भरत धुमाळ,दौलत धुमाळ आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

–