कळस च्या साई बोऱ्हाडे ची चंद्रपूर येथील सैनिक स्कूल साठी निवड!

अकोले /प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील साई अमोल बोऱ्हाडे याची चंद्रपूर येथील सैनिक स्कूल मध्ये निवड झाली आहे.
मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कडून राज्यात सातारा आणि चंद्रपूर येथे स्कूल चालवण्यात येत आहेत.चंद्रपूर सैनिक स्कूल मधून दरवर्षी देशातून सर्व राज्यातून मुले NTA ची एंट्रन्स परीक्षा देऊन प्रवेश घेतात हि परीक्षा अतिशय खडतर असून त्यात शाळेत मुलांचे शारीरिक आणि मानसिक तयारी करून घेतात . साई अमोल बोऱ्हाडे ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर येथे शिकत होता , सैन्यात अधिकारी होण्याची प्रचंड महत्वाकांक्षा असणाऱ्या साई ने इयत्ता तिसरी पासूनच सैनिकी स्कूल चा अभ्यास सुरु केला , त्यासाठी त्याने पुणे येथे अनिस डिफेन्स अकादमी आणि हिसार हरियाणा येथे वर्ग देखील केले. त्यासाठी कुठेही अभ्यास करण्याची प्रचंड इच्छाशक्ती त्याने बाळगली होती. 6 ते 12 पर्यंत चंद्रपूर सैनिकी स्कूल मध्ये शिक्षण घेऊन पुढे NDA प्रवेश करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. साई च्या यशासाठी ध्रुव ग्लोबल स्कूल चे प्राचार्य , त्याचे वडील उद्योजक अमोल चंद्रभान बोऱ्हाडे , आई मयुरी बोऱ्हाडे , भारत बोऱ्हाडे, चंद्रभान बोऱ्हाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल साई बोऱ्हाडे याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.