श्रीमती सहाणे यांचे काय॔ आश्रमशाळा शिक्षकांना प्रेरणादायी! –.श्री. नवनाथ गायकवाड.

राजूर प्रतिनिधी
शासकीय आश्रम शाळा विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करीत घडलेल्या श्रीमती सुमन सहाणे यांचे जीवन संघर्षमय राहिले. येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला संधी मानून त्यावर मात करत त्यांनी आदिवासी विकास विभागाच्या आदश॔ आश्रमशाळा विद्यालयाच्या रोपट्याचे संगोपन करीत त्याचे वटवृक्ष फुलाविलण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते असे गौरव उदगार राजूर प्रकल्प कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी नवनाथ गायकवाड यांनी काढले
आदश॔ आश्रमशाळा भंडारदरा कॅम्प मवेशी या विद्यालयाच्या माध्यमिक शिक्षिका श्रीम.सुमन विश्वनाथ सहाणे यांच्या सेवापुर्तीनिमित्ताने शैक्षणिक संकुल मवेशी येथील आदश॔ आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्यातर्फे गौरव व कृतज्ञता सोहळा शनिवारी 30 एप्रिल रोजी विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री. नवनाथ गायकवाड बोलत होते
कर्तुत्वनिष्ठ, शिस्तबद्ध जीवन शैली, मनमिळावू, अभ्यासू, समाजशास्त्र विषयात निष्णात असे व्यक्तीमत्वाच्या श्रीमती सहाणे यांचे काय॔ आश्रम शाळा शिक्षकांना सदैव प्रेरणादायी ठरेल असे ते म्हणाले या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक श्री. शिवाजी नरके,पंडीत कदम हे उपस्थित होते.
आश्रमशाळा व सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीम.सुमन सहाणे यांचा सपत्नीक भेटवस्तू,साडी, शाल, श्रीफळ, देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील गावातील विविध पालक, सामाजिक, राजकीय व्यक्तींनी स्वतंत्रपणे सत्कार केला. यावेळी सर्व मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करीत श्रीम सहाणे यांना शुभेच्छा दिल्या.
या सेवापुर्ती सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्तीं यांनी आश्रम शाळेतील 34 वर्षातील अनेक आठवणींना उजाळा देऊन शिक्षकांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी एकलव्य रेसिडेन्सियल पब्लिक स्कुलचे प्राचार्य डॉ. देवीदास राजगिरे, मुख्याध्यापक श्री. शिवराज कदम,,ज्योती निभ॔वणे, पत्रकार प्रकाश महाले, श्री वाकचौरे सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. पांडुरंग पडवळे, उपाध्यक्ष श्री. दशरथ मुंडे, जेष्ठ शिक्षक आदिनाथ सुतार, मारूती लहामटे,संतोष गायकर, वैभव लांडगे, अंकुश चावडे,दत्तात्रय बारामते, अविनाश पवार,सहाणे सर, मुकुंद सुय॔वंशी, समाधान सुय॔वंशी, बुद्धभुषण भामरे, शालकराम यादव,रंजना जगधने,अच॔ना पुयड, रुपाली डोंगरे, भारती भोकरे तसेच शैक्षणिक संकुल मवेशी येथील सव॔ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, श्रीम.सहाणे यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक विद्यार्थी आदी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.भाऊसाहेब खरसे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. जगन्नाथ जाधव यांनी केले. तर मान्यवरांचे आदिनाथ सुतार यांनी आभार मानले .————–