गाव तेथे समता परिषद पोहोचवण्याचे काम राज्यभर सुरु करणार -प्रदेश उपाध्यक्ष आंबादास गारुडकर

अहमदनगर- प्रतिनिधी
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्यावतीने दक्षिण आढावा बैठक रविवारी 1 मे रोजी कायनेटिक चौक येथील राष्ट्रवादी भवन या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि परिषदेचे राष्ट्रीय सचिव रवी सोनवणे तसेच जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून गावागावांमध्ये वाड्या वस्त्यांवर सर्व समाजाला सोबत घेऊन समता परिषदेची शाखा स्थापन करण्याचा निर्धार करण्यात आला. संपूर्ण राज्यामध्ये महात्मा फुले संघटनेला नव चैतन्य निर्माण करण्यासाठी गाव तिथे समता परिषद प्रभाग तिथे समता परिषद अशा प्रकारचा कार्यक्रम राज्यभर सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी पहिली सुरुवात हि अहमदनगर शहरापासून करण्यात आले. असल्याचे प्रतिपादन प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे , नगरसेवक रमेश गोरे, पंचायत समिती सभापती किसनराव रासकर , अशोकराव कानडे , संजय गारुडकर , अशोकराव गोरे , महिला अध्यक्षा सुनिता नगरे, दत्ता जाधव , नगर तालुका अध्यक्ष रामदास फुले , संजय डाके, सुमित राऊत , बबनराव गुमटकर , निखिल शेलार , संदिप जाधव , वसत राधवण , पांडुरंग व्यवहारे ,भाऊसाहेब पुंड ,राहुल भुजबळ मच्छिंद्र टापरे यांसह तालुकाध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी तसेच समता सैनिक उपस्थित होते .