अहमदनगर

श्री क्षेत्र देवगड येथे उत्तराधिकारी पंचसंस्कार दीक्षा सोहळ्या चे आयोजन

दत्तात्रय शिंदे

माका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांनी स्थापित केलेले व प्रवरा मातेच्या कुशीत असलेले भगवान श्रीदत्तप्रभूंचे स्थान म्हणजे श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे विद्यमान मठाधिपती महंत ह भ प भास्करगिरीजी महाराज यांनी आपल्या अध्यात्मिक कार्यासाठी उत्तराधिकारी म्हणून श्री कृष्णा महाराज मते यांची निवड केलेली आहे,तो उत्तराधिकारी दीक्षा समारंभ ६ मे २०२२ रोजी श्री दत्त मंदिर संस्थान श्री क्षेत्र देवगड येथे आयोजित करण्यात आलेला आहे

, या कार्यक्रमासाठी राज्यातील प्रमुख संत त्याचप्रमाणे देशभरातून मान्यवर संतांना निमंत्रित करण्यात आलेले आहे, पैकी काही संतांचे देवगड येथे अागमन झालेले आहे,कार्यक्रमासाठी संपूर्ण देवगड परिसर हा आहे सडा, रांगोळी,फुलांनी सजवण्यात आलेला आहे,कार्यक्रमासाठी व्यासपीठ, बिछायत,रंगमंच व्यवस्था ही औरंगाबाद येथील जाधव मंडप डेकोरेटर्सचे रखमाजी जाधव व कल्याण जाधव करतआहेत, ध्वनी व्यवस्था ही रामेश्वर शिंदे (टाकळीभान)आणि कार्यक्रम सर्वांना पाहता यावा यासाठी चित्रीकरण एलईडी वर प्रक्षेपण रवि शेरकर यांचा समुह करत आहे, उत्तराधिकारी पंच संस्कार दीक्षा सोहळा हा वेदशास्त्रसंपन्न श्री गणेश गुरु ज्ञानेश्वर नगर यांच्या पौरोहित्याखाली श्री क्षेत्र त्रंबकेश्वर,श्रीक्षेत्र पैठण,श्रीक्षेत्र राक्षस भुवन,श्रीक्षेत्र प्रवरासंगम आदी तीर्थक्षेत्राहून ब्रह्मवृंद हे देवगड मध्ये दाखल झालेले आहेत,त्यादृष्टीने व्यवस्थेच्या दृष्टीने गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी भक्तांच्या वेगवेगळ्या कमिट्या स्थापन करत नियोजन केले आहे,ज्यामध्ये आलेल्या भक्तांसाठी आसन व्यवस्था, मान्यवर साधुसंत यांचे पूजा विधि,त्याचप्रमाणे प्रसाद व्यवस्था,अन्नपूर्णा कक्षामध्ये आलेल्या सर्व भक्तांना प्रसादाची व्यवस्था असल्याने प्रसाद बनवण्याच्या कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे, मोठ्या प्रमाणावर भक्त येणार असल्याने कुठेही अस्वच्छता निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात येणार आहे,आलेल्या पाहुणे,यात्रेकरू, साधुसंत यांच्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यामध्ये दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र अशा रांगा तयार करण्यात आलेले आहे,पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ भक्त त्याचप्रमाणे अहमदनगर,टाकळीभान, ज्ञानेश्वर नगर,गोगलगाव,गंगापूर तालुक्यातील काही गावे हे सेवेसाठी येणाऱ्या भक्तांच्या स्वागतासाठी दाखल झालेली आहे,अालेल्या भक्तांना स्वच्छ व थंड मिनरल वॉटरची व्यवस्था जागोजागी केलेली आहे,कार्यक्रमाचे नियोजन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार देवगडचे कामगार, कर्मचारी, कार्यालयीन अधिकारी हे जातीने पार पडत आहे, कार्यक्रमांमधील सकाळी सात ते दहा यज्ञ मंडपामध्ये होम हवन आधी नामकरण विधी कार्यक्रम होईल, त्याचप्रमाणे ९ते१० श्री महंत कैलासगिरीजी महाराज गिरी आश्रम सावखेडा यांचे होईल, दहा ते साडे अकरा उपस्थित पूजनीय संतांचे व मान्यवरांची शुभ संदेश, शांतीपाठ त्यानंतर श्रींची महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल,वरील कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवगड संस्थानच्या वतीने महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी केलेले आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button