भंडारदरा परिसरातील काजवा महोत्सवाची जय्यत तयारी!

तर पर्यटकांना ५ हजाराचा दंड!
संजय महानोर
भंडारदरा / प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील भंडारद-याच्या काजवा महोत्सवाला बळकटी यावी हा उद्देश समोर ठेऊन शेंडी ( भंडारदरा ) येथील वन्यजीव विभागाच्या विश्रामगृहात अभयारण्यात क्षेत्रातील वनकमीटी सदस्य व संरपंच यांच्यासमवेत वन्यजीव विभागाची बैठक संपन्न झाली असुन काजव्यांच्या कालचक्राला कोणतीही बाधा येऊ नये म्हणुन वेगवेगळ्या सुचना कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव विभागाच्या वतीने देण्यात आल्या .
राज्यभरातील पर्यटकांच्या पसंतीचा असणारा भंडारदरा परिसरातील काजवा महोत्सवाला यावर्षी मोठी गर्दी होईल असा अंदाज गृहीत धरून स्थानिक प्रशासनाने या काजवा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू केली आहे कोव्हिडं काळात दोन वर्षापासून या काजवा महोत्सवा वर निर्बंध आले होते यामुळे दोन वर्षांच्या कालखंडानंतर होणारा हा पहिलाच काजवा महोत्सव आहे
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परीसरात तसेच रिंगरोडवरील काजवा महोत्सव जगविख्यात आहे .या काजवा महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले मे महिन्याच्या अखेरीस आपोआपच भंडारद-याच्या दिशेने वळतात . गत दोन वर्षांपासुन कोरोना या विषाणुजन्य रोगामुळे भंडारद-याचा काजवा महोत्सवाही थांबला गेला होता .पंरतु आता कोरोना सदृष्य स्थिती दूर झाल्या ने भंडारद-याच्या वन्यजीव विभागाच्या कार्यक्षेत्रात १५ मे ते १५ जुन या कालावधीत काजवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे . काजव्यांचे दिवसेंदिवस प्रमाण घटत चालल्याचे दिसुन येत असुन काजव्यांच्या कालचक्रात कोणतीही बाधा येऊ नये म्हणुन वनविभागाकडुन काही ठोस पावले उचलली गेली आहेत. त्यासाठी काजवा महोत्सवात भंडारदरा परीसरात येणा-या पर्यटकांना एका विशिष्ट ठिकाणी आपली वाहने पार्क करुन नंतरच काजव्यांचा आनंद घेता येणार आहे . मद्य , साऊंड सिस्टीम, व प्लास्टिक पर्यटकांना अभयारण्यात घेऊन जाता येणार नाही . अभयारण्यात वरिलपैकी कोणतीही वस्तु आढळुन आल्यास किमान ५ हजार रु .दंड आकारण्यात येणार आहे .कोणतेही वाहन रस्त्यात पार्क करण्यात येणार नाही. रस्त्यात वाहन पार्क केलेले आढळुन आल्यास १ हजार रु दंड वन्यजीव विभागाकडुन आकारण्यात येईल .तसेच काजवा महोत्सवात वनविभागाच्या अभयारण्यात रात्री ९ :३० नंतर पर्यटकांना प्रवेश मिळणार नाही . अभयारण्यातुन रात्री १० : ३० पर्यंत बाहेर पडणे बंधनकारक असेल . अभयारण्यात डि जे व इतर वाद्य वाजवताना आढळुन आल्यास वनविभाग व पोलिस विभाग मिळुन कारवाई करतील अशी माहीती वन्यजीव विभागाचे प्रमुख सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांनी दिली .
काजवा महोत्सवाताच्या कालावधीत काजव्यांच्या लिलयेचा आनंद घेताना आदिवासी लोकसंस्कृतीच्या लोककलेचा आनंद घेता यावा यासाठी लव्हाळवाडी येथे लोककलेचे प्रत्येक शनिवारी व रविवारी आयोजन करण्यात येणार असल्याची माहीती या बैठकीत देण्यात आली
अकोले तालुक्यातील भंडारद-याच्या काजवा महोत्सवाला बळकटी यावी हा उद्देश समोर ठेऊन शेंडी ( भंडारदरा ) येथील वन्यजीव विभागाच्या विश्रामगृहात अभयारण्यात क्षेत्रातील वनकमेटी सदस्य व संरपंच यांच्यासमवेत वन्यजीव विभागाची बैठक संपन्न झाली काजव्यांच्या कालचक्राला कोणतीही बाधा येऊ नये म्हणुन वेगवेगळ्या सुचना कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव विभागाच्या वतीने देण्यात आल्या .
या बैठकीसाठी वन्यजीव विभागाच्या हद्दीतील समावेश असलेल्या गावांचे सरपंच , वनकमेटी सदस्य, नासिक वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे , राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे , वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे , दत्ता पडवळे हे उपस्थित होते .
कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील काजवा महोत्सवात पर्यटकांनी काजव्यांचा निखळ आनंद घ्यावा . काजवा महोत्सवास गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी . काजवा महोत्सवात मद्यपान करुन धांगडधिंगा करणा-या पर्यटकांना कारवाईस सामोरे जावे लागेल …
.नरेंद्र साबळे …
सहाय्यक पोलिस निरीक्षक, राजुर
भंडारदरा काजवा महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी येणारा पर्यटक हा दुरवरुन येणारा आहे. फॅमिली कुटुंबासह काही पर्यटकांना उशिर झाल्यास त्यांच्या आनंदात विरंजन पडु नये यासाठी अभयारण्यात प्रवेशासाठी मुदतवाढ मिळण्यास मदत व्हावी
… दिलीप भांगरे ,
सरपंच शेंडी ग्रामपंचायत
