माधवराव ताजने दूध संस्थेच्या चेअरमन पदी रामनाथ शिंदे बिनविरोध !

अकोले प्रतिनिधी
अकोले शहरातील शेकईवाडी येथील माधवराव ताजणे सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या चेअरमनपदी अगस्ती साखर साखर कारखान्याचे माजी संचालक रामनाथ भिमाजी शिंदे यांची तर व्हा चेअरमन पदी राजेंद्र दत्तू गायकवाड यांची निवड करण्यात आली सलग्न सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) अहमदनगर सहकार अधिकारी श्री जी एस गाडे, श्री मरकड यांच्या उपस्थितीत ही निवड पार पंडली
यापूर्वी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध निवड पार पडली होती या नंतर नवनिर्वाचित संचालकांची बैठक काल पार पडली या बैठकीत ही निवड पार पडली यावेळी गौरव ताजणे, शिवाजी ताजणे, राजेंद्र शिंदे ,भाऊराव गायकवाड ,भागवत गायकवाड, सौ अनिता गायकवाड ,सचिव भाऊसाहेब भरितकर राजेंद्र गायकवाड ,आदी उपस्थित होते निवडणूक बिनविरोध पार पाडणे कामी दत्ता गायकवाड, प्रमोद ताजणे, गुलाब गायकवाड,दिलीप ताजने,जयराम शिंदे, संतोष बाळसराफ ,रामदास बाळसराफ ,अर्जुन गायकवाड, गुलाब गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले
माधवराव ताजने ही दूध संस्था अनेक वर्षांपासून सक्षमपणे सुरू असून दररोज १ हजार लिटर पेक्षा अधिक दूध संकलन करते सभासदांना प्रत्येक वेळी चांगला भाव देत सभासदांचा विश्वास संपादन केला असून यापुढेही संस्थेचे कामकाज अधिक वेगाने सुरू ठेवून सभासदांना दुधाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न राहील असे नवनिर्वाचित चेअरमन रामनाथ शिंदे यांनी सांगितले