उंचखडक बु. येथे श्रीराम नवमी निमीत्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन…!!

अकोले : श्री प्रभु श्री रामचंद्र जन्मोत्सव सोहळ्याचे निमित्ताने अविरत चालु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रारंभ काल गुढीपाडव्याच्या दिवशी मोठ्या मंगलमय व आनंदी वातावर्णात पार पडले
यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती,यावेळी धर्म ध्वजारोहण व घटस्थापना करण्यात आली यावेळी देवस्थानचे महंत विठ्ठल पंत महाराज,देवस्थानचे उपाध्यक्ष अशोकराव देशमुख,रामनाथ हासे गुरुजी,विश्वस्त प्रतापराव देशमुख,शांताराम देशमुख ,मनोहर देशमुख, सुगंधराव देशमुख, विश्वस्त दिलीप मंडलिक,देवराम शिंदे, राव भरत राजस्थान,तुकाराम आबा देशमुख,अशोक रंगनाथ देशमुख,हिम्मत मोहिते,रवी महाराज गुंजाळ,विजय मंडलिक, राजेंद्र शिंदे,कुंडलिक मंडलिक, कैलास हासे , लक्ष्मण बाबा मंडलिक,भरत देशमुख, भाऊसाहेब देशमुख, नितीन देशमुख, रमेश देशमुख सर ,महिपाल देशमुख, शशी भाऊ देशमुख,विश्वास देशमुख, शिवाजी देशमुख,रमेश मंडलिक , अंकुश शिंदे, व अनेक वारकरी संप्रदायातील मंडळी उपस्थित होते,
यानिमित्ताने सर्व भाविकांना आवाहन करण्यात आले की सप्ताह काळात अनेक नामवंत कीर्तनकार यांचे सुश्राव्य कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे व त्यानंतर दररोज संत पंगत तथा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्वानी या संधीच लाभ घ्यावा ही विनंती तसेच यावेळी देवस्थान येथे सुरू असलेल्या प्रभू श्री राम मंदिर जीर्णोद्धार तथा नवनिर्माण बांधकाम चालु असल्याने ज्या भाविकांना आपल्या इच्छा शक्ति नुसार देणगी द्यायची असेल त्यांनी या पर्वणी काळात देण्याची कृपा करावी व या महान कार्यात आपले योगदान द्यावे हीच विनंती श्री सद्गुरु यशवंत बाबा धार्मिक ट्रस्ट श्री क्षेत्र राममाळ उंचखडक बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आली.