पारनेर तालुक्यातील तिखोल सेवा सोसायटी चेअरमन पदी नबाजी ठाणगे

सभापती काशिनाथ दाते यांनी केला सत्कार
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील अतिशय संवेदनशील असणाऱ्या तिखोल विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमनपदी नबाजी यशवंत ठाणगे यांची तर व्हा.चेअरमन पदी अश्विन दशरथ मंचरे यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती माननीय काशिनाथ दाते सर व शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदासजी भोसले यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित चेअरमन, व्हा.चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी संचालक, माजी सभापती अरुणराव ठाणगे, ठकसेन ठाणगे, बाळू ठाणगे, राघु ठाणगे, सुभाष कावरे, भाऊसाहेब ठाणगे, संदीप कुमार ठाणगे, उत्तम साळवे, हौसाबाई ठाणगे, सविता ठाणगे, रेश्मा ठाणगे उपस्थित होते
सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन सेवा सोसायटी मार्फत जास्तीत जास्त कर्ज कसं वाटतं येईल यासाठी प्रयत्न करणार तालुक्याच्या प्रशासनात सर्वाधिक अनुभव असणारे सभापती काशिनाथ दाते सर यांच्या मार्गदर्शनाने सोसायटी मध्ये काम करणार
: नबाजी शेठ ठाणगे चेअरमन, तिखोल
जनसेवा पॅनल विजयी करण्यासाठी माजी सरपंच सुभाष ठाणगे सर, माजी चेअरमन सुभाष ठाणगे,माजी चेअरमन नागचंद ठाणगे, माजी सरपंच नबाजी मंचरे, विठ्ठल ठाणगे, जवाहरलाल ठाणगे, भारत ठाणगे, संभा ठाणगे, शिवाजी धोंडीबा ठाणगे, सुदाम कावरे, गोवर्धन वाघ, अशोक ठाणगे,बाळु भिमा ठाणगे, संतोष ठाणगे सर, राघू ठाणगे, लक्ष्मण ठाणगे, संकेत ठाणगे,पप्पु ठाणगे या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
: