नारायणगव्हाण च्या विकासाचा अनुशेष भरून काढणार : सभापती काशिनाथ दाते सर

पारनेर प्रतिनिधी
शनिवार दिनांक १४ मे २०२२
नारायणगव्हाण ते कळमकर वाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (ग्राम-१२६) १५ लक्ष, कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती मा. काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते व पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेशराव शेळके ,पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, युवा सेना तालुका प्रमुख नितीन शेळके, शिवसेना उपतालुका प्रमुख जयसिंग धोत्रे, मार्केट कमिटीचे संचालक युवराज पाटील, वाडेगव्हाणचे सरपंच संतोष शेळके, उद्योजक संतोष गायकवाड या मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले. कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन माजी सरपंच सुरेश बोरुडे सर यांनी केले.

यावेळी बोलताना सभापती दाते म्हणाले नारायणगव्हानचे प्रलंबित प्रश्न यापुढेही मार्गी लावणार असून यामध्ये राहिलेला कळमकरवाडी रस्ता, नारायणगव्हाण ते कडून रस्ता यांची राहिलेले काम आहे आपण मार्गी लावणार आहे माझ्या सभापती काळात गाव, गावच्या मूलभूत गरजा यामध्ये लाईट असेल, गटार लाईन, रस्ते यांना मी प्रथम प्राधान्याने कामे केली तसेच पाणीपुरवठा,आरोग्य सेवा या सक्षम करण्याचा प्रयत्न केला अडचणीत राहिलेली कामे केल्यास लोकांना जो आनंद होतो त्याचेच खरे समाधान आपल्याला असल्याचे सभापती दाते यांनी सांगितले पिंपरी कोलंदर चा तीनशे लोकसंख्या असलेली भोंडवे वस्ती यामध्ये तलाव असल्याने रस्ता जाण्या- येण्या साठी नव्हता पन्नास वर्षापासून ज्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता या रस्त्याचा प्रश्न माझ्या माध्यमातून सुटला गेला तसाच सारोळा सोमवंशी येथील नवले वस्तीचा प्रश्न होता तोही माझ्या माध्यमातून सुटला गेला त्या लोकांना एवढा आनंद झाला झाला की त्यांनी कामाच्या भूमिपूजनाच्या दिवशी आमची बैलगाडीतून मिरवणूक काढली असे प्रश्न मार्गी लावण्यात नक्कीच आनंद आपल्याला होत आहे माझ्या टाकळीढोकेश्वर जिल्हा परिषद गटात विकास कामे करताना तालुक्यातील इतर गावात ही विकास कामे केली बोरुडे सरांनी या गावासाठी जे कामे मागीतले ते सर्व देण्याचा प्रयत्न केला माझ्या निधीतून या गावला पशुसंवर्धनचा नवीन दवाखाना उभारणे करीता ३० लक्ष रुपयांचा निधी दिलेला आहे त्याचे भूमिपूजनही लवकरच आपण करू. बोरुडे सर गावच्या विकासासाठी कायम आग्रही असतात या गटात शिवसेना जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे लोकांनी उभे राहण्याचे आवाहनही सभापती दाते यांनी केले.
नारायणगव्हाण आणि दाते सरांचे विशेष प्रेम आहे त्यांनी मागील अडीच वर्षात बंधारे, सी.डी. वर्क रस्त्यांची कामे या गावाला दिलेली आहेत सभापती काळात पारनेर तालुक्यात सर्वात जास्त निधी कोणी आणला असेल तर भूतकाळातही असा निधी आणला नाही सरांनी गेल्या अडीच वर्षात सर्वात जास्त निधी आणला :
गणेश शेळके,
सभापती पंचायत समिती पारनेर
यावेळी चेअरमन बाळासाहेब चव्हाण, व्हा. चेअरमन बबनराव खोले, शहाजी शेळके गुरुजी, बाळासाहेब गोरे, रमेश शेळके, शंकर चव्हाण, काशिनाथ नवले, बंडोपंत नाईक, हुसेन शेख, सोन्याबापु शेळके, सहादु मामा शेळके, विक्रम विठ्ठलराव शेळके, अमोल चव्हाण, सतीश कांडेकर, मिलिंद शेळके, दादासाहेब शेळके, सुनील शेळके, राहुल शेळके, अर्जुन नवले, अजिंक्यतारा दरेकर, शंकर हरदे, तुकाराम मोरे, मंदा चव्हाण, बाळू शेळके, प्रेरणा चव्हाण, अनिता चव्हाण, अनिता वालेकर, जयश्री चव्हाण, छबु चिपाडे,बलभिम अवचिते, हुसेन शेख, सतिश गाडीलकर,आनंदा पवार, नितीन कोहकडे, अशोक शेळके, भुजंक शेळके, भास्कर शेळके, बाळु नवले, कैलास शेळके, कामाचे ठेकेदार विनायक कवाद इ. मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश बोरुडे यांनी केले तर आभार शंकर चव्हाण यांनी मानले.
