४४ लाख शेतकऱ्यांना वीज बील माफी… अजित पवार

पारनेर येथील संवाद मेळावा.
दत्ता ठुबे/ पारनेर दि.१९
राज्यातील महायुती सरकारने शेतकरी बांधवां साठी ४४ लाख शेतकऱ्यांना वीज बील माफी दिली आहे तर येत्या काही महिन्यात शेतकऱ्यांना टप्याटप्याने दिवसा वीज पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
ते पारनेर येथे आयोजित संवाद मेळावा प्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर पारनेर अहिल्यानगर मतदार संघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नव निर्वाचित जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष संध्याताई सोनवणे, कार्याध्यक्षा अंजलीताई आव्हाड, जिल्हाध्यक्ष कपिल पवार,माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुजित झावरे, कृषि व पशुसंवर्धन माजी सभापति काशिनाथ दाते, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, माजी नगराध्यक्ष विजय औटी, आदी मान्यवरांसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महायुती सरकारने माझी लाडकी बहिण योजनेच्या यशाबद्दल अजित पवार म्हणाले की, या योजनेने महिलांना स्वावलंबी बनवून सक्षम केले आहे. या योजनेमुळे लाडक्या बहिणीला स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत झाली. अशा या योजनेच्या अंमल बजावणीवर विरोधकानी सातत्याने विरोध केला. आणि ही योजना अमलात आल्या नंतर आता पैसे येत असले तरी निवडनुकीनंतर योजना बंद केली जाईल अशी विरोधकांनी अफवा पसरवल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली की या अर्थसंकल्पात ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकांना या योजनांचा फायदा होणार आहे. या योजने अंतर्गत सरकार महिलांना १५०० रूपये देते. विरोधी पक्षातील अनेकांनी हि योजना बंद असल्याचा दावा केला असला तरी तुम्हीं माझ्या मनगटावर बांधलेल्या राखीची शपथ घेतो की मी ही योजना कधीच बंद होउ देणार नाही तसेच सरकारच्या वतीने रस्ते, वीज, पाणी या विकासाकरिता सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.