
राजूर पोलिसांची कारवाई
विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
राजूर परिसीतील केळुगण, (ता. अकोले) येथे विक्रीसाठी आणलेला देशी व विदेशी दारूचा साठा राजूर पोलिसांनी छापा टाकून पकडला
नवनाथ सुरेश देशमुख हा चोरुन देशी व विदेशी दारुची विक्री करत आहे अशी माहीती मिळाली असता या ठिकाणावर कारवाई करणे करिता पोलीस स्टाप व पंच असे केळुगण गावात खाजगी वाहनाने रवाना झाले
इसम नवनाथ सुरेश देशमुख याचे घराजवळ जावुन रात्री 08.30 वा. छापा टाकला असता त्याचे घराच्या जवळ पत्र्याच्या शेडजवळ जावून सदर ठिकाणची झडती घेतली असता सदर ठिकाणी खालील प्रमाणे देशी व विदेशी दारुचा मुद्देमाल मिळून आला
1)2560/-रुकि. च्या मॅकडल नं.1 ची कंपनीच्या 16 बाटल्या प्रत्येकी 180 मिली प्रत्येकी 160/-रु दराने
2) 3600/-रुकि. च्या अॅफीसर चॉईस कंपनीच्या 24 बाटल्या प्रत्येकी 180 मिली, प्रत्येकी 150/-रु दराने
3) 3900/-रुकि. च्या इंपेरीयल ब्ल्यु कंपनीच्या 26 बाटल्या प्रत्येकी 180 मिली, प्रत्येकी 150/-रु दराने
4) 51840/-रुकि.च्या बॉबी संत्रा कंपनीच्या 864 बाटल्या प्रत्येकी 180 मिली, प्रत्येकी 60/-रु दराने
5) 2560/-रु. किमतीच्या बॉबी संत्रा कंपणीच्या 239 बाटल्या प्रत्येकी 90 मिली प्रत्येकी 30/-रु. दराने असा
एकुण-69070/- रु. किमतीचा . मुद्देमाल जप्त केला आरोपी विरुद्ध नवनाथ सुरेश देशमुख, रा. केळुगण, ता. अकोले याचे विरुद्ध राजुर पोलीस स्टेशनला गु.र.नं. 102/2022 मु.प्रोव्ही. अॅक्ट 65(ई) प्रमाणे पोकों/गाढे यांनी दिलेल्या फिर्याद वरून गुन्हा दाखल करन्यात आला असून . पुढील तपास पो ना/ श्री भडकवाड करित आहे.
अवैध दारु विक्री करणारे व्यक्ती व ठिकाणे या बाबत माहीती असल्यास राजुर पोलीस स्टेशनशी संपर्क करावा आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल. असे आवाहन राजूर पोलिसांनी केले आहे