इतर
छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल आक्षेपार्ह कमेंट, आज पारनेर बंद

पारनेर:-छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह कमेंट टाकल्याच्या निषेधार्थ आज पारनेर बंदची हाक देण्यात आलीय.
पारनेर तालुक्यातील पाबळ येथील वसीम सय्यद या युवकाने इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने हिंदुत्ववादी युवक आक्रमक झाले. संबंधित युवकाविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. रात्री उशिरा या युवकाला घेतलं ताब्यात. पारनेर पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलय. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शांतता राखावी असे आवाहन पारनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.