कर्जुले हरेश्वर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

बहुजनांचा विकास हीच बाबासाहेबांची शिकवण : सभापती काशिनाथ दाते
पारनेर प्रतिनिधी
कर्जुले हरेश्वर ता. पारनेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात संपन्न झाली यावेळी जयंतीचे औचित्य साधून आंबेडकर नगर येथे ४० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते व शिवसेना तालुका उपप्रमुख पंढरीनाथ उंडे, माजी सरपंच साहेबराव दादा वाफारे, एकनाथ दाते सर, सरपंच संजिविनी आंधळे, उपसरपंच मिनीनाथ शिर्के, ग्रामसेवक एस.एस जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर कर्जुले हर्या येथे माजी आ. विजय औटी यांच्या या माध्यमातून सभामंडप रुपये -१० लक्ष, जलशुद्धीकरण आरो प्लांट बसवणे – ५ लक्ष, सभामंडप परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे – ३लक्ष, वॉल कंपाऊंड करणे – ५ लक्ष, वस्तीतील रस्ता कॉंक्रिटीकरण करणे – १० लक्ष, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करणे – ५ लक्ष, हाय मॅक्स बसवणे – २ लक्ष अशा ४० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले

यावेळी बोलताना सभापती दाते सर म्हणाले बहुजन समाजाचा विकास झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी संपूर्ण देशभर लढा उभारला आम्ही सर्व एक आहोत समता, बंधुभाव याची शिकवण त्यांनी आपणास दिली कर्जुले हरेश्वर गावात माझ्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी पाच वर्षाच्या काळात दिला गेलाय याचं कारण माझं प्राथमिक शिक्षण या गावात झालेला आहे या गावात माझ्या गावाप्रमाणेच आपलेपणा मला वाटत आहे या गावांमध्ये माजी आमदार विजयराव औटी यांच्या माध्यमातून खूप कामे झाली वाड्या-वस्त्यावर पिण्याच्या पाण्याची २ कोटी ३५ लक्ष रुपयांची योजना त्यांच्याच काळात मंजूर झाली व आताही जल जीवन मिशन अंतर्गत राहिलेल्या वस्त्यांना पाणीपुरवठा करणे करता जवळपास एक कोटी रुपये मंजूर झालेले आहे डॉ. बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे आज विकासकामांच्या माध्यमातून ते आपल्याला सिद्ध करता आले याचे मला समाधान वाटत आहे. अनेक सुखसुविधा पासून आपण दूर होतो त्या सर्व सुख सुविधा मिळवण्याचे काम आपण केले ज्या घटनेच्या आधारे संपूर्ण देशात स्वातंत्र्य व लोकशाही अबाधित आहे जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही आपली आहे याचे सर्व श्रेय डॉ. बाबासाहेबांचे आहे समाजाचा विकास करणे हेच बाबासाहेबांना अपेक्षित होते त्यांची शिकवण घेऊन आपण विकास कामे केली या गावात गेल्या पाच ते दहा वर्षात किती विकास कामे झाली आहे हे गावातील प्रत्येक नागरिकाला माहित आहे आपल्या गावातील राहीलेली सर्व कामे करणार असल्याचेही सभापती दाते यांनी सांगितले या वस्तीमध्ये चांगले भव्य बुद्ध मंदिर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन सभापती दाते यांनी दिले बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा व आयोजकांचे आभार त्यांनी मानले.
आमच्या जन्मापासून या वस्तीमध्ये कोणतेही विकास काम झालेले नाही परंतु मा.आ. विजयराव औटी व काशिनाथ दाते सर यांनी मूलभूत लाईट, पाणी, रस्ता या सुविधा पुरवल्या तसेच प्रत्येक कुटुंबास घरकुल दिले आहे येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण ताकतीने दाते सरांच्या मागे खंबीरपणे उभे राहू
: धीरेंद्र रोकडे,
सचिव भीमज्योत तरुण मंडळ
यावेळी भिमज्योत मित्र मंडळ अध्यक्ष गंगाधर रोकडे सर, उपाध्यक्ष गणेश रोकडे, सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख संदीप आंधळे, अनंथा शिर्के, भीमज्योत तरुण मंडळाचे सचिव धीरेंद्र रोकडे, सागर वाघ, दीपक आंधळे, रणवीर आंधळे, विश्वास रोकडे, देवराम आग्रे, शैलेश रोकडे, आकाश रोकडे, नवनाथ आंधळे, गोरक्ष भालेराव, ऋषिकेश रोकडे, वीरेंद्र रोकडे, रामदास पावडे, रोहिदास कोकाटे, रामदास आंधळे, रामचंद्र रोकडे, चंद्रकांत रोकडे, दिनकर रोकडे, आनंदा रोकडे, शब्बीर पठाण, बाबाजी उंडे,लक्ष्मीकांत रोकडे, चंद्रशेखर आंके, मयूर आंधळे, विजय शिर्के, रमेश रोकडे, जयंत रोकडे, राजू रोकडे, विकास पाटोळे, सुमित आंधळे, कार्तिक चिंतामणी, दत्ता जाधव, भिमराज रोकडे, अजय रोकडे, प्रकाश आंके, भास्कर पाटोळे, आप्पा कांबळे, किरण साळवे, हरी वाघमारे, निलेश कासार, आशिष पटेकर, भाऊसाहेब लोखंडे, जितेश गायकवाड, मच्छिंद्र बर्डे, तुषार वाघ, विजय वाघ, पिगर वाघ, प्रथमेश गायकवाड, आदित्य गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष गंगाधर रोकडे तर आभार सरपंच संजिविनी आंधळे यांनी मानले