..त्या वाचाळवीर अभिनेत्रीवर पारनेर मध्ये गुन्हा दाखल,

जामीन मंजूर होण्याआधी तिला पारनेर पोलिसांनी ताब्यात घ्यावे : संजीव भोर
पारनेर प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या धर्तीवर विडंबन काव्य तयार करण्यात आले. हे विडंबन काव्य अभिनेत्री केतकी चितळेने सोशल मीडियावर टाकले होते. त्यामुळे ती वादात सापडली आहे. देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानने काल केतकी विरोधात गुन्हा दाखल केला होता. तर पारनेरमध्येही काल रात्री शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. संजीव भोर यांनी केतकी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ झाली आह
यासंदर्भात संजीव भोर यांनी सांगितले की, ठाणे पोलिसांच्या कोठडीत असलेल्या आरोपी केतकी चितळेला जामीन मंजूर होण्याआधीच पारनेर पोलिसांनी ताब्यात घ्यावे. जगद्गुरू तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व इतर बहुजन महामानव, तसेच मराठा बहुजन समाज आणि या समाजातील सामाजिक, राजकीय नेतृत्व यांना तुच्छ लेखणे, त्यांचा सातत्याने द्वेष करणारा एक वर्ग महाराष्ट्रात व देशात शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहे. हा वर्ग स्वतःला उच्च वर्णिय समजतो.
ते पुढे म्हणाले की, केतकी चितळे, नितीन भावे हे या विकृत विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात. शरद पवार यांच्यासारख्या एखाद्या जनमान्य नेतृत्वाच्या मृत्यूची आस बाळगणे, त्यांनी जीवघेण्या गंभीर आजारावर केलेली मात हे खरे तर अनेकांना प्रेरणादायी आहे. मात्र हे नाकारून त्यावर व्यंग करणे, हे योग्य नाही. स्वतःला श्रेष्ठ, उच्च वर्णिय म्हणवणारी माणसं विचाराने किती खुजी असतात. हे केतकी चितळे, अॅड. नितीन भावे व त्यांच्या भाईबंदाच्या कृतीतून दिसते. या विकृतीला लोकशाही मार्गाने धडा शिकविण्यासाठी हा गुन्हा दाखल केला आहे. पारनेर पोलिसांकडून तत्पर कारवाईची अपेक्षा असल्याचे भोर यांनी सांगितले.