इतिहास विषयात नोकरी, व्यवसायाच्या अनेक संधी -प्रा. विशाल रोकडे

दत्ता ठुबे.
पारनेर – उच्च शिक्षण हे मानवास नेहमी प्रगतीपथावर नेण्यासाठी सहाय्यभूत ठरत असते. पदवीस्तरावर अनेकविध विषयात उच्च शिक्षणाच्या सोयीसुविधा विद्यार्थ्यांना प्राप्त होत असतात. इतिहास हा प्रमुख विषय घेऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व सरळसेवा भरतीद्वारे भारतीय प्रशासन व्यवस्थेत संधी मिळते. पुरातत्व विभाग, पुराणवस्तू संग्राहलये, अभिलेखगार, मोडी लिपी तज्ज्ञ, शिक्षक, प्राध्यापक अशा अनेकविध नोकरीच्या संधी तर पर्यटन व्यवस्थापक, ऐतिहासिक मार्गदर्शक, इतिहास लेखक, संशोधक आदी व्यवसायाच्या संधी प्राप्त होत असतात. एकूणच इतिहास विषयात नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी आहेत , असे प्रतिपादन अळकुटी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा प्रा विशाल रोकडे यांनी केले.
अळकुटी येथील पद्मभूषण लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने माजी विद्यार्थी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्रा. विशाल रोकडे यांनी ‘इतिहास विषयातील संधी’ या विषयावर विशेष व्याख्यान दिले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कुंदा कवडे होत्या. यावेळी प्राचार्या डॉ. कवडे यांनी उपस्थितांचे स्वागत करत कार्यक्रमाची प्रासंगीकता विषद केली.
या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य प्रा. अमोल नालकर, प्रा. अर्जून चाटे, प्रा. संजय जाधव, प्रा. शर्मिष्ठा बोरुडे, प्रा. दशरथ पानमंद, प्रा. प्रियंका दिवटे, प्रा.दत्तात्रय शेळके, प्रा. शिवाजी शेळके, प्रा. मच्छिन्द्र बेलोटे, प्रा.सुनिता जाधव, प्रा. विनायक सोनवणे, प्रा.पोपट सुंबरे, डॉ. शांता थोरात, प्रा. रावसाहेब झावरे, प्रा. संदीप गेटम, प्रा. मोहन माने, प्रा. सुषमा करकंडे, प्रा. सचिन बलसाने, प्रा. सुप्रिया पारखे, प्रा. ऋषिकेश गिते, प्रा. पूजा वैरागर, प्रा.पांडुरंग उघडे, प्रा. अनुराधा गाढवे, प्रा. राजाराम गोरडे, गोरख घोलप, सूर्यमाला भोर, सुनिता भालेराव, अनिल दिवटे, नितीन घोलप, छाया म्हस्के, विकास सोनवणे, राहुल बोरुडे, सागर शितोळे, मनोहर कनिंगध्वज, मच्छिन्द्र म्हस्कुले, वैजनाथ आवारी, रवींद्र वाघ, शिवाजी कळंबे, पांडुरंग शिरोळे व इतर मान्यवर तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, स्पर्धक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रास्ताविक डॉ. एस एस थोरात यांनी केले , तर आभार प्रा. मोहन माने यांनी मानले आणि सूत्रसंचालन प्रा. रावसाहेब झावरे यांनी केले.