अहमदनगर
कळस येथील मारुती वाकचौरे यांचे निधन

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कळस येथील जुन्या पिढीतील अभियंता मारुती गजाबा वाकचौरे यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८९ वर्षाचे होते. सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये उपअभियंता पदावर कार्यरत होते. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, उस्मानाबाद, कोयना, महाराष्ट्र सदन दिल्ली येथे अभियंता म्हणूनही काम केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले चे उपअभियंता महेंद्र वाकचौरे, सौ.जयश्री धनकारगरे, सौ.विजया गुंजाळ, अँड हेमा वामन यांचे ते वडील होते. पत्नी, सून, नातू, नाती असा मोठा परिवार आहे.