मुंबईत लेबर20 चा कार्यक्रम सम्पन्न

मुंबई 21 एप्रिल 23 ;
G 20 च्या निमित्ताने स्थापन झालेल्या L 20 गटाचा
महाराष्ट्रातील पहिला कार्यक्रम आज 21 एप्रिल 2023 रोजी मुंबई येथे भारतीय।मजदूर संघाच्या अध्यक्षतेखाली नारायण मेघाजी श्रम विज्ञान संस्था, परळ या ठिकाणी संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री
नामदार श्री सुरेशभाऊ खाडे हे उपस्थित होते. लेबर 20 हे कामगारांचे प्रश्न मांडण्याचे एक उत्तम व्यासपीठ असून ही आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
भारत सरकारकडे G-20 चे अध्यक्षस्थान आल्यानंतर जे विविध गट तयार करण्यात आलेले आहे त्यातील L 20 कामगार विभागाशी संबंधित गट असून त्याची बैठक मुंबईमध्ये संपन्न झाली. या गटाने सर्वांना
सामाजिक सुरक्षा, महिला आणि त्यांचे प्रश्न या दोन विषयावर एकमत घडवून आणण्याचे ठरवलेले आहे त्यानुसार या दोन विषयावर या कार्यक्रमात चर्चा
झाली.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते श्री सीके साजिनारायनजी यांचे अभ्यासपूर्ण भाषण झाले. त्यांच्या भाषणातून G 20 चा एकूण आवाका आणि महत्व लक्षात आले. महाराष्ट्राचे कामगार आयुक्त श्री देशमुख साहेब यांनीही आपले विचार मांडले. अॅड अनिल ढुमने यांनी L20 वरील पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले.

याप्रसंगी इंडीयन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष श्री अनंत सिंघानिया, TJSB बँकेचे चेअरमन व HR तज्ञ श्री शरद गांगल, हिंद मजदुर किसान पंचायतचे नेते श्री सुभाष मळगी, महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था संचालक श्री एस एम साठे यांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला भारतीय मजदूर संघ हिंद मजदुर किसान पंचायत आयटक, All India Unorganised and Peasant Workers
Union, मुंबई महानगर पालिका, रेल्वे, पोस्ट, संरक्षण, पोर्ट अॅड डॉक, वीज मंडळ, कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षक, सहकारी बँका, घरेलु कामगार, बांधकाम
कामगार, औद्योगिक कामगार, राज्य कर्मचारी तसेच कामगार संघटनांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे कामगार खात्यातील अधिकारी वकील उपस्थित होते. महिलांची संख्या लक्ष्णीय होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.मोहन येनुरे यांनी केले, सूत्र संचालन बापू दडस यांनी केले तर श्रीपाद कुटासकर
यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
