सुनीता भांगरे, अशोक भांगरे यांनी घेतली अजित दादांची भेट!

अकोले प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री अशोकराव भांगरे व अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सदस्या तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या। राजूर च्या सदस्या सौ.सुनिताताई भांगरे यांनी काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सौ विद्याताई चव्हाण यांची भेट घेतली
.या भेटीतअकोले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी गेल्या दोन महिन्यापासून चालू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी शाखा उपक्रमांचा अहवाल अजित दादांना व विद्याताई चव्हाण यांना सादर केला. व तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली नामदार अजितदादा पवार यांनी आपल्या कार्यालयात बोलताना सांगितले की अकोले विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधणीसाठी अशोकराव भांगरे व सौ सुनिता ताई भांगरे यांचे कामाचे कौतुक केले
दादांनी पक्षवाढीसाठी जोमाने काम करण्याच्या सूचना त्यांना दिल्या
