माजी विद्यार्थ्यांच्या कर्तुत्वामुळे अमृतवाहिनी चा आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक- आ. बाळासाहेब थोरात

संगमनेर / चंद्रकांत शिंदेे पाटील
राष्ट्रीय स्तरावरील विविध मानांकने मिळवलेल्या अमृतवाहिनी एमबीएने गुणवत्ता पूर्ण उच्च शिक्षणाचे सातत्य कायम राखले असून या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे अमृतवाहिनी एमबीएचा आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक निर्माण झाला असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते तथा राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी काढले.
अमृतवाहिनी एमबीए मध्ये १९९७ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख ह्या होत्या. तर व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, एमबीएचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे आदी उपस्थित होते. या प्रसंगी श्रीलंका पेप्सी कंपनीचे नॅशनल हेड अमित जोशी, क्रॉक्स ग्रुपचे जॉय तालुकदार, एमएसआरटीसीचे संजय गायधनी, सॅमसंग इंडियाचे संजय खत्री, जीनस ब्रीडिंग इंडियाचे राजीव कुमार सिन्हा ,कांकरिया ऑटोमोबाईलचे सचिन कोरडे, आकाश ॲडव्हर्टायझिंगचे हिमांशू पाठक यांसह आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणारे कॉलेजचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. बाळासाहेब थोरात म्हणाले की, ग्रामीण भागात असूनही अमृतवाहिनी संस्थेने गुणवत्तेने आपला देशभर लौकिक निर्माण केला आहे.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गुणवत्ता आणि विविध उपक्रम यामुळे येथील विद्यार्थी हे ज्ञान आणि परिपूर्ण असतात यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध कंपन्या कॅम्पस इंटरव्यू साठी येत असतात.यामधून अनेक विद्यार्थ्यांना नोकरीच्या सुविधाही उपलब्ध होत असतात.या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी देश-विदेशात आपल्या कार्य कर्तुत्वाने केलेल्या कामामुळे या संस्थेचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव होत असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.
सौ शरयूताई देशमुख म्हणाल्या की विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देताना प्लेसमेंट कक्ष, क्रीडांगण, सुसज्य ग्रंथालय, ऑनलाइन प्रणाली सह सर्व शिक्षण सुविधा , निसर्ग रम्य व स्वच्छ परिसर यामुळे या संस्थेचा विद्यापीठातही मोठा लौकिक आहे. पंचवीस वर्षात या संस्थेतून २४६० विद्यार्थ्यांनी एमबीएची पदवी घेतली असून सर्व विद्यार्थी जगभरात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. संचालक डॉ. बी एम लोंढे म्हणाले की माजी विद्यार्थी हेच खरे अमृतवाहिनी संस्थेचे ब्रँड अँबेसिडर आहेत. याप्रसंगी दुबई स्थित हॉटेल इंडस्ट्रीचे रियाज राज, श्रीलंकेतील पेप्सी कंपनीचे नॅशनल हेड अमित जोशी, संजय गायधनी ,पंकज मुरपाणी, सचिन कोरडे आदींसह विविध विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या आयोजनासाठी डॉ. बी. एम. लोंढे , समन्वयक डॉ एल. डी. शहा आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
माजी विद्यार्थी मेळाव्याच्या यशस्वीतेबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख, सहकार महर्षीषी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक इंद्रजीत थोरात, बाळासाहेब पा. गुंजाळ, लक्ष्मणराव कुटे ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. धुमाळ यांनी अभिनंदन केले आहे.