अकोले तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवींद्र मालुंजकर यांची हाकालपट्टी !

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवींद्र मालुंजकर यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली
राष्ट्रवादीचे युवक चे जिल्हा अध्यक्ष कपिल पवार यांनी त्यांची हकालपट्टी केली पक्षविरोधी कारवायांमुळे मालुंजकर यांची पदावरून हकालपट्टी केल्याची माहिती आज अकोले येथे पत्रकार परिषदेत दिली
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे काम करत असताना पक्षाची व आमदार लहामटे यांची प्रतिमा मलिन होईल व पक्षाला नुकसान पोहचेल असे कृत्य केले या बाबत त्यांना सूचना देऊनही त्यात बदल झाला नाही यामुळे त्यांच्या पक्ष विरोधी कारवाई बाबत वरिष्ठांना अहवाल दिला होता अखेर जिल्हाअध्यक्ष कपिल पवार यांनी त्यांची पदावरून हकालपट्टी करून त्यांना पदमुक्त केले
अडीच वर्षापासून अकोले तालुक्यांमध्ये आमदार महोदय अतिशय चांगल्या प्रकारचे काम करत आहे परंतु मालूजकर यांनी त्यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांना त्रास देण्याचे काम केलं कुठल्याही प्रकारची शहानिशा व खात्री न करता त्या आमदार यांच्या कामावर टिका टिपण्णी करत सोशल मीडियावर पोस्ट टाकत रवी मालूजकर यांनी आमदार महोदयांची आणि पक्षाची बदनामी केली आमदार यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम रविभाऊ यांनी केल्याचे सिद्ध झाल्याने वरिष्ठांच्या आदेशाने त्याना पदावरून हटवून हकालपट्टी केल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर सचिव विकास बंगाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
यावेळी शहराध्यक्ष अमित गायकवाड ,हरिभाऊ पातळे सीमा मानकर आदी उपस्थित होते
रवी मालुंजकर यांची तालूका राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या अध्यक्षपदी 23 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हाध्यक्ष कपिल पवार कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी पत्र देऊन नेमणूक केली होती त्यानंतर दोन वर्षाच्या आतच श्री रवि मालुंज कर यांना पदावरून पायउतार व्हावे लागले