शनिशिंगणापूरात महिला दिनी आरोग्य शिबिर .५५० महिलांची आरोग्य तपासणी.

महिलांनी आत्मनिर्भर बनावे–माजी सभापती सुनीता गडाख,
विजय खंडागळे
सोनई प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचा मुख्य उद्देश महिला सबलीकरण करणे आहे,स्त्रीला अनेक नाती जोपासावी लागतात,प्रत्येक कुटुंबातील एक आधारस्तंभ स्त्री आहे,प्रत्येक क्षेत्रात महिला प्रगतीपथावर आहे,पण तरीही स्त्रीयांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते म्हणून आजच्या काळात स्त्रीने आत्मनिर्भर बनण्याची गरज असल्याचे मत महिला बचत गटचळवळीच्या नेत्या व माजी पंचायत समितीच्या सभापती सौ. सुनीताताई गडाख यांनी व्यक्त केले.
गडाख ह्या शनिशिंगणापूर देवस्थान व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेवी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
गडाख पुढे म्हणाल्या,स्त्रीचे स्थान महत्वाचे असून स्त्री शिवाय कुटुंब पूर्ण होत नाही, एक स्त्री मुलगी,पत्नी,आई,मावशी,आज्जी,अशी अनेक भूमिका जबाबदारीने पार पाडत असते,आज झाशीची राणी,सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, सिंधुबाई सपकाळ,प्रतिभा पाटील,पी.टी उषा,अशा अनेकानी आपापल्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केल्याचे सांगितले. ना.शंकरराव गडाख हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून एक बळ निर्माण झाले आहे.
प्रमुख अतिथी म्हणून बालरोगतज्ज्ञ व महिला व्याख्यात्या डॉ.उज्वला शिरसाठ ह्या होत्या. या कार्यक्रमात पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, प.स.सदस्य बाळासाहेब सोनवणे, मीनाक्षी सोनवणे, सविता झगरे, विश्वस्त सुनीता आढाव, सरपंच पुष्पाबाई बानकर, जयश्री ताई बानकर, बेबीताई दरंदले,आदींसह देवस्थान विश्वस्त अध्यक्ष भागवत बानकर, आप्पा कुऱ्हाट, आप्पा साहेब शेटे,दीपक दरंदले, नितीन शेटे, आर. के.शेटे, प्रा. शिवाजी दरदले,कार्यकारी अधिकारी जी. के.दरंदले,संजय बानकर,बाळासाहेब बानकर,यांचेसह, अनेक उपस्थित होते .
प्रमुख व्याख्याते डॉ शिरसाठ म्हणाले, मुलगा,मुलगी असो त्यांचे स्वागत करा, आरोग्य चांगले सांभाळा,मोबाईल चा अतिरेक करू नका,मुला, मुलींना शिक्षण द्या,भावी पिढी घडवा, असा वैद्यकीय सल्ला डॉ शिरसाठ यांनी दिला.
प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ .अभिराज सूर्यवंशी यांनी केले, सूत्रसंचालन श्रीमती शीतल झरेकर,व संगीता फासटे तर आभार ढाकणे यांनी मानले .
या आरोग्य शिबिरात डॉ. सुनील वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ५५० महिलांनी आरोग्याची तपासणी केली