मंझरी हवेली येथे कृषिकन्यांचे आगमन

बीड दि.१०
गणेश ढाकणे
बीड तालुक्यातील मंझरी हवेली येथे बीड येथील आदित्य कृषि महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी कृषिकन्या यांचे मंझरी हवेली या गावात आगमन झाले.
यावेळी कृषिकन्या नागरगोजे कल्पना,मुंडे अंजली, नलावडे किरण, नलावडे आकांक्षा, झुंझारे स्नेहा, लेंगरे लतिका, गवई आरती, हागारे पूनम यांचे शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन स्वागत केले.
तसेच आदित्य कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तांबे सर, ग्रामीण जागरूकता कार्यानुभव समन्वयक :- डॉ. संदीप मोरे, कार्यक्रम अधिकारी :- युवराज धावणे
यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्यांनी
ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२३-२०२४ याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली ह्या कृषिकन्या शेतकरी यांना ३ महिने शेती विषयी मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी गावातील सरपंच रेशमा गुजर,ग्रामपंचायत सदस्य संतोष बनसोडे व शेतकरी बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागरगोजे कल्पना करत असताना ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२३-२०२४
विविध शेतीसंबंधी व्यवसाय याबद्दल गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.