संगमनेर शिक्षक बँकच्या जागेचा प्रश्न तातडीने सोडवू- बापूसाहेब तांबे

शनिवार दि.10 जानेवारी
शिक्षक बँक सभागृह संगमनेर येथे प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली सदिच्छा मंडळ यांचे वतीने शिक्षक बँकेचे नूतन चेअरमन मा.श्री.गोरक्षनाथ विटनोर व व्हा.चेअरमन मा.श्री.ज्ञानेश्वर माऊली शिरसाठ यांचा संगमनेर येथे सत्काराचे नियोजन करण्यात आले होते
या प्रसंगी नाशिक जिल्हा पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार मा.डॉ.श्री.सुधीरजी तांबे यांनी उपस्थित राहून शिक्षक बँक चेअरमन व व्हा.चेअरमन व जिल्हा पदाधिकारी यांचा सत्कार करून शिक्षकांचे विविध प्रश्न समजावून घेत मार्गदर्शन केले.
शिक्षकांना मार्गदर्शन करताना राज्य नेते बापूसाहेब तांबे यांनी संघटना पातळीवरील विविध प्रश्न व त्याबाबत राज्य पातळीवर सुरू असलेले प्रयत्न त्यातून संघटनेस मिळत असलेले यश याबाबत माहिती दिली.तसेच शिक्षक बँकेची सद्याची वाटचाल व आगामी ध्येय धोरणे याविषयी चर्चा करत,,विकास मंडळ याबाबत सर्वांचे प्रबोधन करत सर्वांना माहिती दिली.संगमनेर शिक्षक बँकेच्या जागेबाबत सकारात्मकता दाखवत जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक बँक सर्व प्रकारचे सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.
संघाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.बबनदादा गाडेकर यांनी संघटना पातळीवरील विविध प्रश्नाबाबत सर्वांची मते जाणून घेत प्रश्न सोडविण्यासाठी संघटना कसे प्रयत्न करत आहे याविषयी माहिती दिली.
विकास मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.प्रल्हाद भालेकर यांनी विकास मंडळ इमारत उभारणीसाठी चालू असलेल्या प्रयत्नांची माहिती देत,इमारत उभारणीसाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन केले.
तालुक्याचे विविध प्रश्न मांडताना संचालिका मा. श्रीम.सरस्वती घुले मॅडम यांनी शिक्षक बँक रंग रंगोटी व नवीन जागा खरेदी याविषयी आग्रही भूमिका मांडली.
त्यानंतर शिक्षक नेते मा.श्री.सुनील ढेरंगे यांनी शिक्षकांना सतावत असणाऱ्या ऑनलाइन कामाबाबत एकसूत्रता यावी म्हणून संघटना पातळीवर राज्याकडून प्रयत्न व्हावेत अशी सूचना केली.
शिक्षक नेते मा.श्री.राजू राहणे सर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत शिक्षकांचा निवड श्रेणी प्रश्न मांडत शिक्षक बँकेचा कारभार व विकास मंडळ इमारत बांधकाम यावर आपले मत व्यक्त केले.
त्यानंतर शिक्षक नेते मा.श्री.संतोष दळे सर यांनी TET च्या प्रश्नावर प्रकाश टाकत याबाबत राज्य संघानेने मा.मुख्यमंत्री यांची भेट घ्यावी व TET मुळे प्रभावित होणाऱ्या शिक्षकांची संख्या याबाबत सविस्तर चर्चा करून यावर मार्ग काढावा अशी सूचना करत.विकास मंडळ बांधकामासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन करत “स्वतःचे रु.1लाख” योगदान जाहीर केले.
याच कार्यक्रमात राज्य पातळीवर स्पर्धेसाठी निवड झालेले उपस्थित गुणवंत शिक्षक डॉ.श्री.सदानंद डोंगरे,श्री.नामदेव सानप, यांचा सत्कार मा.आम.डॉ.श्री.सुधीरजी तांबे यांचे हस्ते करण्यात आला. तसेच या स्पर्धेतील विजेते श्री.संपत दरेकर,श्री.सचिन अंकाराम, केंद्रप्रमुख मा.श्रीम.आशाताई घुले यांनाही पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच नाशिक विभागीय शिक्षक क्रिकेट करंडक जिंकणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा प्रातिनिधिक सत्कार यावेळी श्री. पोपट काळे व श्री.मेचकर सर यांनी स्वीकारला.

त्यानंतर सत्काराला उत्तर देताना चेअरमन श्री.गोरक्षनाथ विटनोर व व्हा.चेअरमन श्री.ज्ञानेश्वर माऊली शिरसाठ यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत बँकेच्या कारभारविषयी माहिती देत..संगमनेर शाखेसाठी जागा घेण्यासाठी 9 प्रमुखांची समिती नेमावी व त्यांनी योग्य जागा शोधा अशी सूचना केली.
या प्रसंगी जिल्हा श्रेष्ठी नाशिक जिल्हा विभागीय अध्यक्ष मा.श्री.राजेंद्र सदगीर,मा.व्हा. चेअरमन श्री.बाळासाहेब कापसे, श्री.आबासाहेब नवले,मा.व्हा.चेअरमनश्री.सारोक्ते,मा.श्री.सयाजी राहणे सर ,मा.श्री.पी.डी. सोनवणे ,मा.श्री.राजेंद्र कुदनर सर उपस्थित होते.

तालुक्यातून विकास मंडळ विश्वस्त मा.श्री.संजय शेंडगे ,मा.श्रीम.मनीषा गाढवे मॅडम,महिला आघाडी अध्यक्षा श्रीम.दीपाली रेपाळ मॅडम,सौ.मंगल गायखे मॅडम,श्रीम.देशमुख मॅडम….
शिक्षक श्री.प्रदीप राहणे,श्री.कैलास सहाणे,श्री.प्रकाश शिंदे,श्री.पोपट काळे,श्री.आण्णा कांदळकर,श्री.लहानभाऊ सहाणे,श्री.भाऊसाहेब खेमनर ,श्री.निवृत्ती भागवत,श्री.शिवाजी खेमनर,श्री.राजू देशमुख,श्री.सुनील देशमुख,श्री.संजय कडलग,श्री.शिवाजी चत्तर,श्री.सतू वावरे,श्री.बाळासाहेब कौटे,श्री.शिवाजी आव्हाड,श्री.दशरथ गंभीरे,श्री.अनिल डगळे, श्री.दत्तात्रय वाकचौरे,श्री.चंद्रकांत कर्पे ,श्री.विश्वनाथ वाबळे,श्री.नामदेव सानप ,श्री.सदानंद डोंगरे ,श्री.निलेश हारदे,श्री.दत्तात्रय दिवेकर,श्री.संजय शिंदे,श्री.संजय लिमकर,श्री.संतोष उपरे,श्री.मेचकर सर,श्री.आण्णा मरभळ,श्री.हरिभाऊ सहाणे,श्री.खताळ सर,श्री.संतोष उपरे ,श्री.बाळू चव्हाण,श्री.बाबासाहेब डगळे सर, आदी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



