अहमदनगरकृषी

पठार भागाला पिण्याचे पाणी देणारच –
आमदार लहामटे


मुळा परिसर उध्वस्त होऊ देणार नाही – सिताराम गायकर

आम्ही एकत्र आल्याने त्यांच्या पोटात पोटशूळ उठला – अशोकराव भांगरे

कोतुळ प्रतिनिधी
जलजीवन मिशन अंतर्गत मंजुर योजनेतून संगमनेर तालुक्यातील पठार भागाला पिण्याचे पाणी देणारच आहे असा विश्वास आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी व्यक्त केला

गेल्या काही दिवसापासून मुळा नदी वरील पिंपळगाव खांड धरणाचा पाणी प्रश्न पेटला आहे पाणी प्रश्‍नावरून संगमनेर तालुक्यातील पठार भाग आणि अकोले तालुक्यातील मुळा भागात पाण्यावरून संघर्ष सुरू आहे याबाबत आपली भूमिका जाहीर करण्यासाठी पिंपळगाव खांड धरण स्थळावर तालुक्यातील व पठार भागातील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन व अगस्ती साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सीताराम पाटील गायकर होते

आमदार डॉ लहामटे यावेळी बोलताना म्हणाले की पिंपळगाव खांड धरणात असलेल्या पाण्या चा एक थेंब ही देणार नाही परंतु याच धरणात पठार भागासाठी आवश्यक असणाऱ्या नवीन पाण्याची निर्मिती करू आणि मगच पठार भागाच्या पाणी योजनेला सुरुवात करू पिंपळगाव खांड धरणात नवीन 100 ते 150 दशलक्ष घनफुट पाणी आले नंतरच पठारावरील पाणी योजना पठार भागातील चालू होईल सरकार जनतेला पिण्याचे पाणी देऊ नका ही भूमिका कशी घेणार जनते साठीच तर सरकार आहे ना

आमचे विरोधक पराचा कावळा करत आहे शब्दांचा खेळ करून गावोगावी जनतेची दिशाभूल करत आहे त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे असा टोला त्यांनी पाणी बचाव कृती समितीला लगावला
आम्ही जनतेचे डॉक्टर आहोत आम्ही चेहरे चांगले ओळखतो आणि जनतेचे प्रश्नही जाणतो आणि सोडवतोही विरोधकांनी डुप्लिकेट पणाचा धंदा बंद करावा आदरणीय अजित दादांनी अकोल्यावर कायम प्रेम केले आहे त्यांच्याकडन या प्रश्नाची निश्चित सोडवणूक होईल जनतेने विश्वास ठेवावा
पिंपळगाव खांड धरणाच्या खालील बाजूस अथवा धरणाच्या वरील बाजूस पिंपरी येथे बंधारा बांधून आणि हे नवीन पाणी निर्माण करू मगच पठाराच्या पाणी योजनेचे सुरुवात करू मी राजा हरिश्चंद्राच्या नगरीत राहतो जो शब्द देतो तो पूर्ण करतो असे लहामटे यांनी यावेळी सांगितले

अध्यक्षीय भाषणात सिताराम पाटील गायकर म्हणाले की मुळे चा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सरकार मध्ये अजितदादा सारखा कर्तबगार माणूस आहे त्यांच्यामुळेच पिंपळगाव खांड धरण झाले ज्यांनी धरण दिले ते च्या पाण्याचा प्रश्न निश्चित सोडवतील मला परिसरातील जनतेने मला चाळीस वर्षे जनतेची सेवा करण्याची संधी दिली या जनतेच्या अन्नात विष कालावणार नाही पठार भागातील जनताही आपलीच आहेत त्यांना देखील पाणी मिळालेच पाहिजे या मताशी आम्ही आहोत नवीन पाणी निर्माण करून त्यांच्या पिण्याचा पाणीप्रश्‍न निश्‍चित सोडवला जाईल मुळा नदीवर नवीन दोन साईट बांधणीचे सर्व्हे सुरू आहे लवकरच त्यातून मार्ग काढू असे सीताराम गायकर म्हणाले

अकोल्यातील शेतकऱ्यांना उध्वस्त होऊ देणार नाही धरणांमुळे मुळा बारामही झाली अकोल्यात अगस्ती स्वयंपूर्ण झाला ऊस वाढला अगस्ती सक्षम पणे सुरू असताना कारखाना आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनविरोधक कारखान्याला बदनाम करण्याचे काम करत आहे
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे काँग्रेसचे मीनानाथ पांडे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ ,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलासराव शेळके ,वाघापूर चे भाऊसाहेब रकटे, भाऊसाहेब बराटे ,लिंगदेव चे प्रभाकर फापाळे, कोतुळ चे हेमंत देशमुख बोरी चे संजय साबळे लहीतचे सुभाष गोडसे,पिंपळदरी चे बाळासाहेब रंधे मोग्रस चे योगेश गोडसे ,पांगरी चे भानुदास डोंगरे,। लहीतचे किशोर गोडसे पिंपळ गाव खांड चे विजय जगताप आदींचे यावेळी भाषणे झाले
विकास शेटे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी मुळा परिसरातील शेतकरी मोट्या संख्येने उपस्थित होते

यावेळी के बी हांडे, अशोक देशमुख, शरद चौधरी भाऊसाहेब हाडवळे, यांचे सह चास कोतुळ लिंगदेव बोरी वाघापूर लहित कोतुळ पांगरी पिंपळगा खांड पिंपळदरी व पठार भागातील शेतकरी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button