एकत्रितपणे साजरे केले जाणारे सण ,एकमेकांना प्रेरणा देणारे – शंकर गायकर

कोतुळ प्रतिनिधी
दैनंदिन जीवनात पारंपरिक पद्धतीने सण साजरे केले जातात,मात्र हिंदू धर्मातील एकत्रितपणे साजरे केलेले सण हे महिलांना प्रेरणा देणारे,एकमेकांचे विचाराने दिशा ठरणारे असतात असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रिय मंत्री शंकर गायकर यांनी केले.
कोतूळ(ता.अकोले) येथील श्री वरदविनायक देवस्थान व जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळ यांच्या वतीने गणपती मंदिर येथे आयोजित केलेल्या मकरसंक्रांत निमित्ताने महिला हळदी कुंकू समारंभात गायकर बोलत होते.
भारतीय हिंदू स्त्री ही फक्त स्त्री तत्व नाही तर ती जगण्याचे,उत्साहाचे आणि उत्सवाचे प्रतिक आहे. हळदी कुंकू लावणे ही त्यामधीलच एक कृती आहे. त्या कृतीचे धार्मिक, आध्यात्मिक, आणि सांस्कृतिक महत्त्व आहे व त्या मुळे हिंदू धर्माची महती वाढते असेही ते म्हणाले.या वेळी देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप भाटे,कुलदीप नेवासकर,विनय समुद्र,विशाल बोऱ्हाडे,निवृत्ती पोखरकर,सचिन पाटील,तुकाराम आरोटे,आदी उपस्थित होते.
या वेळी करोनाचे सर्व नियम पाळून महिलांना तिळगुळ देऊन वान लुटण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्या परशुरामी,सविता घाटकर,प्रज्ञा भाटे,व्दारका पोखरकर,वंदना पाठक,वर्षा नेवासकर,स्नेहल राउत,प्रियांका पाटील,अनुराधा पाठक,वृषाली समुद्र,संजीवनी देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले.