इतर

जुनी पेन्शन योजनेसाठी राज्यस्तरीय समिती: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


दत्ता ठुबे


रत्नागिरी येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय शिक्षक मेळाव्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेंनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्याची घोषणा केली व त्यामध्ये शिक्षक संघाचा एक प्रतिनिधी घेण्याचे सूचित केले अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब सालके यांनी दिली.
सोबतच शिक्षक संघाच्या खालील मागण्या संदर्भात घोषणा केल्या त्या पुढील प्रमाने
केंद्र प्रमुखाच्या १००% जागा भरण्याचे आदेश दिले,
जुनी पेन्शनसाठी- अर्थ मंत्री, शिक्षण मंत्री व शिक्षक संघाचा एक प्रतिनिधी घेऊन राज्य स्तरीयसमितीची घोषणा केली व टप्प्याटप्प्याने हा विषय सोडवणार असा शब्द दिला,
१००% विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होणार,
तुम्ही फक्त वेळेवर शाळेत जा कोणत्याही पुराव्याची घरभाडे भत्त्यासाठी गरज राहणार नाही लवकरच G R काढणार ,
१०.२०.३०. ही आश्वासीत प्रगत योजनेच प्रपोजल अर्थ खात्याकडे गेलेले आहे,
पगार डायरेक्ट शिक्षकांच्या खात्यावर जमा लवकरच करणार त्यासाठी स्टेट बँक सोबत शासनाचे बोलणे चालू आहे,
शिक्षकांना अधिकारी होण्याची संधी निर्माण करणार,
कमी पटसंख्येच्या शाळा कधीच बंद करणार नाही,
शाळांमध्ये शौचालय बांधकामासाठी चालू वर्षी 590 कोटीची तरतूद करण्यात आली आहे
,विज बिल भरण्यासाठी 1418 कोटीची तरतूद केलेली आहे . कोणत्याही शाळेचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही,
बदलीसाठी सर्वसमावेशक धोरण राबविणार,
शिक्षक मतदार संघामध्ये प्राथमिक शिक्षकांना मतदानाची सोय उपलब्ध करून देणार
,मुंबईत शिक्षकांना शिक्षक भवन बांधण्यासाठी भूखंडाची व्यवस्था करणार,शिक्षकांची सर्व अशैक्षणिक कामे कमी करणार ,MSCIT ची वसुली तात्काळ थांबवणार
इत्यादी मागण्या मान्य केल्या.

यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे ,पालकमंत्री उदय सामंत , शिक्षण मंत्री दिपकजी केसरकर, संघाचे नेते संभाजीराव थोरात तात्या,अंबादास वाजे, संघाचे सरचिटणीस आबासाहेब जगताप,नेते संजय कळमकर, यांनी मनोगत व्यक्त केले. स्वाती शिंदे यांनी सूत्र संचालन तर उत्तमराव वायाल यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी एन वाय पाटील,बाळासाहेब तंभरे, बाळासाहेब झावरे,पोपटराव सुर्यवंशी यांनी प्रयत्न केले.
अधिवेशनासाठी जिल्ह्यातून आबासाहेब जगताप,संजय कळमकर,रावसाहेब सुंबे,कैलास चिंधे,जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सालके,चांगदेव धेपले,सुदर्शन शिंदे,अनिल अरांगले,सुनील बनोटे, पोपट ठाणगे,विशाल खरमाले,भास्कर नरसाळे ,सर्जेराव घोडके,बाळासाहेब देंडगे,नितीन कोळसे,अमोल मांगुडे,संगीता कुरकुटे,रघुनाथ झावरे,अंबादास गारूडकर,अमोल साळवे,सुनील नरसाळे,अशोक आगळे,संजय रेपाले, विठ्ठल वैराले,अशोक रहाटे,बाळासाहेब रोहकले,मधुकर शिंदे,शिवाजी झावरे, साईकुमार शिंदे,शिवाजी रायकर,कैलास ठाणगे,गणपत देठे,मधुकर मैड,अतुल काकडे,प्रकाश कार्ले,युवराज हिलाल,प्रताप पवार,सचिन अंदुरे यासह सर्व तालुका अध्यक्ष पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button