वासुंदे येथे जिल्हा परिषद शाळांमध्ये दत्तात्रय साळुंके यांच्याकडून पाण्याच्या बॉटल्सचे वितरण

पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील गावठाण, बोकनकवाडी, ठाकरवाडी, लाखे वस्ती आणि वाबळे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये उद्योजक दत्तात्रय साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना पाण्याच्या बॉटल्सचे तसेच शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचे महत्त्व लक्षात घेता, या उपक्रमाला सर्वत्र कौतुक मिळाले. वाढदिवसानिमित्ताने वडगाव सावताळ शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे भेट देण्यात आले.
कार्यक्रमाला उद्योजक दत्तात्रय साळुंखे यांच्यासह जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे, ग्रामपंचायत ज्येष्ठ सदस्य पोपट साळुंके, निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव अमोल उगले, भागूजी दादा झावरे, डॉ. वसुदेव साळुंके, राजेंद्र रोकडे योगेश रोकडे पोपट हिंगडे बबन गांगड भास्कर चेमटे पत्रकार शरद झावरे, बापूसाहेब गायखे, अमोल पोटघन, प्रल्हाद भालेकर, किरण पोपळघट, सागर साळुंके, सिकंदर शेख, बाबाजी हिंगडे, अमोल साठे, रावसाहेब बर्वे शुभम गायखे, सुनील साळुंके, गणेश खंडाळे, संग्राम झावरे, संदीप खंडाळे, सोपान राऊत, सतीश गायकवाड, संदीप व्यवहारे, संदीप दाते गावातील ग्रामस्थ, शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दत्तात्रय साळुंके यांनी सामाजिक कार्यात नेहमीच योगदान दिले असून, त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापकांनी साळुंके यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करताना, हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल, असे सांगितले.
ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आणि उद्योजक दत्तात्रय साळुंके यांच्या कार्याला पाठिंबा दर्शवला. विद्यार्थ्यांनी आनंदाने बॉटल्स स्वीकारल्या आणि साळुंके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अशा उपक्रमांमुळे गाव आणि शाळा यांच्यातील बंध अधिक दृढ होतात, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
उद्योजक दत्तात्रेय साळुंखे हे नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात त्यांनी वडगाव सावताळ येथील शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले आहेत तसेच वासुंदे येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी पाण्याच्या बॉटल्स व शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च त्यांनी टाळला आहे.
गणेश खंडाळे
(अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती वडगाव सावताळ)


