
दोन गटात सरळ लढत होणार
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील अग्रेसर असणाऱ्या कोतुळ येथील कोतुळ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक शनिवार दिनांक 11 जून 2022 रोजी होत आहे या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आज अखेरचा दिवस होता आज तेरा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता 28 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत यामुळे दोन् गटांमध्ये सरळ अटीतटीची लढत होणार असल्याने या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे अगस्ती सहकारी साखर कारखाना आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे
15 जागांसाठी 42 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यापैकी आज 13 उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने घेतले गेले
भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून एकच उमेदवारि अर्ज आल्याने चंदू नाना पवार हे बिन विरोध निवडून आले आहे
संचालक मंडळाच्या 14 जागांसाठी आता निवडणूक होत आहे
सर्वसाधारण आदिवासी कर्जदार मतदार संघात सहा जागांसाठी बारा विशाल नामदेव गोडे संदीप रघुनाथ लेंभे गेणु भिकाजी गोडे ,अमृता भाऊराव दिंदळे, भीमा शंकर गोडे, राजाराम तुकाराम धराडे ,अरुण विष्णू धराडे ,कुंडलिक बुधाजी घिगे , बाळासाहेब लक्ष्मण लेंभे, चंदन गणपत वायळ, काशिनाथ धोंडीबा वायाळ, भागां गंगाराम शेळके असे 12 उमेदवार रिंगणात आहेत
सर्वसाधारण बिगर आदिवासी कर्जदार मतदार संघात 4 जागांसाठी सयाजी मुरलीधर देशमुख ,रघुनाथ गेनू जाधव ,मनोज शिवनाथ देशमुख, दत्तात्रय भाऊ देशमाने, भाऊसाहेब रघुनाथ देशमुख ,सोमनाथ रावजी घोरपडे ,बाळासाहेब जानकीराम देशमुख निवृत्ती सखाराम पोखरकर असे आठ उमेदवार या मतदारसंघात रिंगणात आहेत
अनुसूचित जाती जमाती मतदार संघात एका जागेसाठी भिमराव आबाजी साळवे, प्रकाश पाराजी साळवे असे दोन उमेदवार आहेत
महिला राखीव मतदारसंघात दोन जागांसाठी उषा नामदेव गोडे, सुनंदा नामदेव बांबळे जिजाबाई किसन लहामटे,
,सीताबाई निवृत्ती लहामटे असे चार उमेदवार आहेत इतर मागास प्रवर्गातील मतदार संघात एका जागेसाठी बाळासाहेब संपतराव बेळे बाळासाहेब तुकाराम भुजबळ असे दोन उमेदवार रिंगणात आहेत
दिनांक 11 जून रोजी मतदान होत असून यासाठी 995 मतदार मतदान करणार आहेत
जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब जानकीराम देशमुख आणि मनोज शिवनाथ देशमुख यांच्या दोन राजकीय गटात ही चुरशीची निवडणूक होणार आहे .अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकी साठी प्रतिनिधी पाठविणे आवश्यक असताना दोन गटांच्या वादात संस्थेला कारखान्याचा ठराव देता आले नाहीकोतुळ भागातील ही सर्वात मोठी संस्था असतानाही संस्थेचा ठराव अगस्ती कारखाना निवडणुकी साठी गेला नाही याचे पडसात या निवडणुकीत उमटले जातील असा अंदाज आहे
—/////—–