पोलीस ,उत्पादन शुल्क खात्याने दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांनीच हॉटेल मधील अवैध दारू विक्री बंद पाडली!

धामणगाव पाट येथील घटना
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथील हॉटेल मराठा दरबार या ठिकाणी सुरू असलेलीअवैध दारू विक्री धामणगाव पाट ग्रामस्थांनी बंद पाडली ग्रामस्थांनी वेळोवेळी पोलीस व राज्य उत्पादन विभागाला कळवूनही कारवाई होत नसल्याने अखेर ग्रामस्थानीच आंदोलनाचे हत्यार उपसले अकोले पंचायत समिती चे माजी सभापती भानुदास गायकर यांच्या मालकीचे हे हॉटेल आहे
अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या दारू चा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करून पोलिसां कडे सोपविला ग्रामस्थांनी अचानक हल्ला बोल करत या हॉटेल वर छापा टाकला आज धामणगाव पाट मध्ये आज ग्रामसभा होती यावेळी हा विषय चर्चेला आला ग्रामपंचयत ची परवानगी व घेता भानुदास गायकर यांनी हॉटेल मराठा दरबार धामणगाव पाट येथे अवैद्य दारू विकली जात आहे या ती बंद करण्याचा ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन ग्रामस्थांनी हॉटेलवर जाऊन ही दारू विक्री बंद पाडली
याबाबत ग्रामस्थांनी अकोले पोलिसांना संपर्क साधून ही माहिती दिली असता अकोले पोलीस स्टेशनचे पीआय घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली
अवैधरित्या चालवल्या जाणाऱ्या हॉटेलची ग्रामपंचायत कडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही ग्रामस्थांकडून या प्रकरणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे
हॉटेल पासून अगदी काही अंतरावर गावातील सरस्वती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज , शाळा आहे. विद्यार्थी शाळा शिकण्यासाठी हॉटेलच्या जवळून जा ये करत असतात. त्याच बाजूला बस थांबा आहे जवळच लहान मुलांची वारकरी शिक्षण संस्था आहे .या हॉटेलमुळे गावातील अनेक चांगले प्रपंच उध्वस्त होऊन अनेकांच्या प्रपंचाची राख रांगोळी झाल्याच्या भावना ग्रामस्थानी व्यक्त केल्या. अवैधरित्या चालवले जाणारे हॉटेलची ग्रामपंचायत कडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. दोन-तीन वेळा पोलीस स्टेशनला तक्रार
करून देखील त्यांच्या वरती काही कार्यवाही करण्यात आलेली नाही.तक्रारीनंतर दोन चार दिवसांनी पुन्हा हॉटेल त्याच जोमाने चालू होत असल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत हे पाऊल उचलले .
यावेळेस युवक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मुळा विभाग प्रमुख निलेश घुले, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी धामणगाव पाट शाखाप्रमुख दिपक चौधरी, सरपंच दिपक पारधी, उपसरपंच बाळासाहेब भोर,ग्रामपंचायत सदस्य सचिन भोर, सोमनाथ पारधी, विमल शेळके,सुनिता हेंबाडे, माजी सरपंच अशोकराव शेळके, रोहिदास भोर, ज्ञानदेव भोर, ग्रामस्थ बबलू चौधरी, धोंडीभाऊ भोर, बाळासाहेब
चौधरी, संदीप चौधरी, संतोष चौधरी, संजय भोर, बंडू भोर, वैभव चौधरी, सुभाष भोर, देवानंद रोकडे, विकास चौधरी, प्रमोद चौधरी, भाऊसाहेब चौधरी, दिलीप भोर, प्रभाकर चौधरी, गौराम चौधरी, रुपेश शेळके, विजय चौधरी, अविनाश लोखंडे, अमोल भोर, संजय शेळके, संजय भोर, संदीप शेळके, मयुर चौधरी, किरण चौधरी, कार्तिक राऊत, सोमनाथ वाकचौरे, सागर भोर, अमोल चौधरी, योगेश भोर, प्रमोद चौधरी, विशाल घुले आदी
ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

याबाबत लवकरात लवकर कारवाई करण्यात आली नाही. तर, जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.