एसटी ही जनतेची रक्तवाहिनी आहे सभापती काशिनाथ दाते

पारनेर प्रतिनिधी
पारनेर आगारातील वाहतूक नियंत्रक – दिगंबर तेजमल अडसूळ, वाहक – भिमराज तुकाराम आंधळे, वाहक – गणपत शंकर दाते, चालक – बाळू महादेव शिंदे, वाहक – तात्याबा जयसिंग मांडगे यांच्या सेवापूर्ती समारंभ प्रसंगी सभापती काशिनाथ दाते बोलत होते यावेळी या पाचही मान्यवरांचा सभापती दाते यांचे शुभहस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पारनेर आगार असिस्टंट मॅनेजर अमोल कोतकर होते तर प्रमुख पाहुणे नगर सह्याद्री चे संपादक शिवाजीराव शिर्के, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रामचंद्र मांडगे, बाबा महाराज खामकर, एसटी बँकेचे संचालक शिवाजी कडूस, दिपक शेठ लंके उपस्थित होते

यावेळी बोलताना सभापती दाते म्हणाले एसटीही जनतेची रक्तवाहिनी होती आणि आहे एसटीमध्ये अतिशय अल्प पगारात नोकरी यांना करावी लागली आता सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत पगारात ही बऱ्यापैकी वाढ झालेली आहे एसटी महामंडळात काम करणारे वाहक-चालक, वर्कशॉपमध्ये काम करणारे कर्मचारी, वाहतूक नियंत्रण हे गेली कित्तेक वर्ष महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची सेवा करतायत सरकार आणि महामंडळ यांच्या संयुक्तपणे सेवा अविरत राज्यात चालू आहे याचा फायदा खूप तळागाळातील माणसांना होतोय यामध्ये ६५ वर्षां पुढील ज्येष्ठ नागरिकांना हाफ तिकीट दिले जाते, शाळेतील मुला-मुलींना मोफत पास दिला जातो आणि म्हणून काही एसटीच्या प्रवासात फक्त सवलती दिलेले बसलेले असतात या सर्व सुविधा आपणाला महामंडळाच्या वतीने मिळतात या सर्व सुविधा पुरवत असताना आज आमचे हे पाच शिलेदार सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी घेतलेले कष्ट त्या कष्टाचे आपण सर्व साक्षीदार आहोत अत्यंत कमी पगारावर असलेले महामंडळ निवृत्तीनंतर कुठल्याही प्रकारचे निवृत्तीवेतन अतिशय अल्प प्रमाणात दिले जाते यामुळे त्यांच्या कामाच्या माध्यमातून साचलेली पुंजी त्यांना दिली जाते अशा या महामंडळामध्ये गेली अनेक वर्षे सेवा केली हे सर्व जण आज सेवेतून निवृत्त होत आहेत त्यांचा गौरव करावा तेवढा कमीच आहे असे काम त्यांच्या सेवेतून त्यांनी केले म्हणून मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांना सेवानिवृत्ती नंतरच्या काळात मनापासुन शुभेच्छा देतो. अविरत सेवा करणारे एसटी कर्मचारी मांडगे यांची कन्या एमपीएससी झाली त्यांचे देखील कौतुक केले पाहिजे एवढ्या कमी पगारात आपल्या मुलांना त्यांनी शिकवले आज समाजामध्ये आपल्या मुलांना सुसंस्कृत, सुशिक्षित करणे हीच खरी आपली जबाबदारी आहे आणि हिच आपली पूंजी आहे या पुढील काळात त्यांनी आपले स्वतःकडे व कुटुंबाकडे लक्ष दिले पाहिजे मी या सर्व पाचही मान्यवरांना शुभेच्छा देतो निवृत्तीनंतर त्यांचे आरोग्य सुखदायी राहो हीच परमेश्वराकडे प्रार्थना करून त्यांना सदिच्छा व्यक्त करतो
यावेळी त्यांच्या पत्नी सौ संगीता दिगंबर अडसूळ, सौ सुनिता भिमराज आंधळे, सौ शालुबाई बाळू शिंदे, सौ सुनीता गणपत दाते, सौ शुभांगी तात्याबा मांडगे व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक, आप्तेष्ट उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश चौधरी यांनी केले प्रस्तावना सागर लोंढे यांनी तर सर्वांचे आभार डेपो असिस्टंट मॅनेजर अमोल कोतकर यांनी मानले